मडुरा नाबर प्रशालेत गुरुपौर्णिमा

मडुरा नाबर प्रशालेत गुरुपौर्णिमा

Published on

13644
मडुरा ः नाबर शाळेत गुरुपूजन करताना विद्यार्थी.

मडुरा नाबर प्रशालेत गुरुपौर्णिमा
बांदा ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. स्थानिक समिती सदस्य लक्ष्मण गवस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन, गुरुपूजन केले. विद्यार्थ्यांनी ‘गुरुपौर्णिमा’ व ‘गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व’ या विषयांवर मनोगते व्यक्त केली. सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी जीवनातील गुरुचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. लक्ष्मण गवस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिक्स, प्राची परब, तेजस्वी गावडे आदी उपस्थित होते. वेलंकनी रोड्रिक्स यांनी सूत्रसंचालन केले. प्राची परब यांनी आभार मानले.
................
13643
संतोष गावडे

संतोष गावडे अध्यक्षपदी
वेंगुर्ले ः तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्षपदी भाजप तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे यांची निवड झाली. या समितीवर महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून श्रद्धा गोरे, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून प्रशांत नवार, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी साईप्रसाद नाईक, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी मनोज उगवेकर, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून अनंत केळुसकर, ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधीपदी रामकृष्ण सावंत, शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी व सचिव म्हणून वेंगुर्ले तहसीलदार या समितीवर काम पाहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.