रत्नागिरी- डॉ. तेजानंद गणपत्ये यांना कोकणातील पहिले आयर्नमॅन

रत्नागिरी- डॉ. तेजानंद गणपत्ये यांना कोकणातील पहिले आयर्नमॅन

फोटो ओळी
-rat३p१७.jpg- ः ३M१३५९१ कझाकिस्तान येथे आयर्नमॅन झाल्यानंतर राष्ट्रध्वज फडकावताना डॉ. तेजानंद गणपत्ये.


डॉ. तेजानंद गणपत्ये कोकणातील पहिले आयर्नमॅन

कझाकिस्तानला स्पर्धा ; १५ तासांत पोहणे, सायकलिंग, धावण्यात यश
रत्नागिरी, ता. ३ ः चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलैला कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (१४०.३) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या सोबतच कोकणातील पहिला आयर्नमॅन बनण्याचा मान मिळवला आहे.
डॉ. गणपत्ये यांच्या कामगिरीचा आदर्श घेत कोकण विभागातून भविष्यात नवनवीन आयर्नमॅन घडतील.
आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एकापाठोपाठ करावयाच्या असतात. डॉ. तेजानंद हे ३.९ किलोमीटर पोहले. २.४७/१०० मीटर या वेगाने त्यांनी हे अंतर १ तास ४५ मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केले. २३.२७ किमी/तास या वेगाने १८० किलोमीटर सायकलिंग केले. याकरिता त्यांना ७ तास ४४ मिनिटे व ९ सेकंदाचा वेळ लागला. त्यानंतर त्यांना धावायचे होते. त्यांना ४२ किलोमीटर धावण्यासाठी ५ तास २९ मिनिटे १४ सेकंद लागले. ०७.४९ मिनिट्स प्रतिकिमी या वेगाने ते धावले. हे तीनही क्रीडाप्रकार एका पाठोपाठ पूर्ण केले. याकरिता त्यांना एकूण वेळ १५ तास १७ मिनिटे व ४२ सेकंद लागले. या वेळेत त्यांनी एकंदर अंतर २२६.७ किमी अंतर पार केले.
डॉ. गणपत्ये यांनी कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू यांचे मार्गदर्शन घेऊन प्रशिक्षण घेतले. रोज एक ते दीड तास सराव, शनिवार-रविवार २ ते ३ तास सराव असे शेड्यूल होते. कागल येथे येथे २१ किलोमीटर रनिंग हाफ मॅरेथॉन, ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलोन (बेळगाव) आणि पुणे, कोल्हापूर, सातारा येथे ३ हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलोन पूर्ण केल्या. त्यानंतर कझाकिस्तान येथे आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला. डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून दोन वर्षे कठोर प्रयत्न केले आहेत. २०१९ मध्ये घशामध्ये गाठ आढळली व कर्करोगाचे निदान झाले. मुंबईत जाऊन केमोथेरपी, सर्व उपचार पूर्ण केले. पत्नी डॉ. अश्विनी अतिशय खंबीरपणे पाठिशी उभी राहिली. कुटुंबीय व मित्रमंडळींनी पाठबळ दिले. आजारमुक्त झाल्यावर वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आणि मित्रांसोबत सायकलिंग सुरू केले. चिपळूण सायकलिंग क्लबने मोठा पाठिंबा दिला. केमोनंतर वर्षभरात अशक्यप्राय वाटणारी बीआरएम पूर्ण केली.

कोट
सायकलिंग असो किंवा रनिंग असो किंवा अजूनही दुसरा एखादा खेळ असो, छोटे छोटे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करत राहिले आणि सरावामध्ये नियमितपणा ठेवला तर सहजच पुढचे पुढचे टप्पे गाठत जाऊ शकतो. माझे गंभीर आजारपण आणि फिटनेसचा प्रवास यातून अनेकांना प्रोत्साहन मिळेल.
- डॉ. तेजानंद गणपत्ये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com