मालवण ‘राष्ट्रवादी’ची
शरद पवार यांना साथ

मालवण ‘राष्ट्रवादी’ची शरद पवार यांना साथ

Published on

13684
डॉ. विश्वास साठे

मालवण ‘राष्ट्रवादी’ची
शरद पवार यांना साथ
मालवण, ता. ३ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी पक्षात आहोत. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी आज स्पष्ट केली.
राज्याच्या राजकारणात काल (ता. २) मोठी उलथापालथ झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेल्या अन्य आठ आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर अनेक स्तरातून राष्ट्रवादी पदाधिकारी भूमिका मांडत आहेत. मालवण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. साठे यांनी आपण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले. तर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही पक्षाध्यक्षांसोबत असल्याचे सांगितल्याची माहिती डॉ. साठे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.