फोंडाघाट शाळेत रेनकोट वाटप

फोंडाघाट शाळेत रेनकोट वाटप

Published on

kan61.jpg
M14234
फोंडाघाटः येथील माळवाडी शाळेतील मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले.

फोंडाघाट शाळेत रेनकोट वाटप
फोंडाघाट, ता. ६ः प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या तर्फे फोंडाघाट जिल्हा परिषद माळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या शाळेत एकूण ५४ मुले शिकत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते रेनकोट वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद घेत शिक्षणातून आपली प्रगती करावी. हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपले भविष्य उज्ज्वल करावे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश वंजारे, संदीप तांबट, मुख्याध्यापिका सौ. जोशी, श्रीमती गोसावी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.