दिगवळे शाळेचे स्पर्धा परीक्षेत यश

दिगवळे शाळेचे स्पर्धा परीक्षेत यश

Published on

kan६२.jpg
M१४२३५
दिगवळेः येथील शाळा क्र. १ च्या मुलांचे अभिनंदन करताना शिक्षक.
--
दिगवळे शाळेचे स्पर्धा परीक्षेत यश
कनेडी , ता. ६ः ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे आयोजित राज्यस्तरीय ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेमधील मुलांनी यश पटकावले आहे. दुसरीतील प्रज्वल प्रसाद मसुरकर याने १७८ गुण संपादन करून कनेडी केंद्रात प्रथम क्रमांक तर प्रशालेतील सारा महेंद्र तांबे या विद्यार्थिनीने १७२ गुण संपादन करून कनेडी केंद्रात द्वितीय येण्याचा मान पटकावला. प्रज्वल आणि सारा यांच्या या सुवर्णमय यशानिम्मित ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे मार्फत मेरिट सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच या विद्यार्थांना मुख्याध्यापक सुनिल गावकर, पदवीधर शिक्षक के. पी. सावंत यांच्या हस्ते तर ज्येष्ठ शिक्षिका सौ. गावकर, उपशिक्षिका प्रांजली मसुरकर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. या विद्यार्थांना वर्गशिक्षिका प्रांजली मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.