संक्षिप्त

संक्षिप्त

वडापमधून प्रवासाचा
प्रवाशांनी घेतला धसका
दाभोळ ः दापोलीत डमडम व मालवाहतूक ट्रकच्या अपघातानंतर वडाप वाहतुकीचा चांगलाच धसका घेतला आहे. यामुळे एसटी बसमधून प्रवाशांची गर्दी सुरू झाली आहे. वेळेत एसटी मिळत नसल्याने दापोलीतील हर्णै, पाजपंढरी, अडखळ, केळशी या मार्गावरील अनेक प्रवासी हे खासगी वाहनांनी प्रवास करतात; मात्र रविवारी आसूद जोशीआळी येथे डमडम व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. यात सातजणांना आपले प्राण गमवावे लागले, याची भीती आता प्रवासीवर्गात निर्माण झाली असून आता अनेकजण एसटीनेच प्रवास करू लागले आहेत. एसटीच्या गर्दीत वाढ झालेली असल्याचे दिसत असले तरी वेळेवर एसटी बसेस सुटत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.


वराडकर महाविद्यालयात
अमली पदार्थविरोधी दिन
दाभोळ ः दापोली येथील न. का. वराडकर कला रा. व्ही. बेलोसे वाणिज्य (कै.) शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागातर्फे राजश्री शाहू महाराज जयंती आणि जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन साजरा करण्यात आला. या वेळी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक व्ही. टी. कमळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक एल. पी. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक समिरा सय्यद, महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एस. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


गुणवत्ता शोधपरीक्षेत
पोफळी शाळेचे यश
चिपळूण ः गुणवत्ता शोधपरीक्षेत पोफळी प्राथमिक शाळेच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवले. या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. या विद्यार्थ्यांमध्ये पहिलीची विद्यार्थिनी फलक शेख हिने राज्यस्तरीय विशेष गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ग्रामीणच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत कैवल्य देशपांडे १४२ गुण, शौर्य कोलुगडे १३६, अनन्या शिंदे १३४, हर्ष विचारेने १३२ गुण मिळवले. केंद्राच्या गुणवत्ता यादीत लिबा शेख १२६, आराध्या पानगलेने १२६ गुण मिळवले. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पृथ्वीराज लोहार १३२, आद्या चव्हाण पाटील १२६, श्रीनिधी पेठे १२४, आर्या गायकवाड १२२, ९ वी रोशन मंडोळे १२२ गुण, ९ वा ऋतुजा जाधव १२० गुण मिळवले. गुणवत्ता यादीत शौर्य नरळकरने ११४ गुण मिळवले. तिसरीच्या ग्रामीण राज्यस्तरावर किमया देशपांडे २४४, साईशा कोरे २२६, निशाद नदाफ २१२, प्रतीक गुळवे २४४, श्रुती पवारने २२६ गुण मिळवले. या विद्यार्थ्यांचा माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शरद सोळुंके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
--------

-rat६p६.jpg ः3M14251 साखरपा ः खड्डेमय झालेला महामार्ग.

साखरप्यात महामार्गाची दुर्दशा, जागोजागी खड्डे

साखरपा ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या दुर्दशेला प्रारंभ झाला आहे. ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने प्रारंभीच्याच मान्सूनने रस्त्याची चाळण करण्यास सुरवात केली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर या रस्त्याची दुर्दशा सुरू झाली आहे. पाली ते साखरपा या सुमारे २५ किमीच्या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी साईडपट्टीनजीक लहान-मोठे खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याला काहीशी उशिरा सुरवात झाली. पावसाला सुरवात होऊन जेमतेम पंधरवडाच झाला आहे. एवढ्यातच महामार्गाची ही अवस्था झाली असेल तर मान्सून जोर वाढल्यावर काय अवस्था असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com