कुणकवण-बंदरवाडी येथे घराला आग लागून नुकसान

कुणकवण-बंदरवाडी येथे घराला आग लागून नुकसान

Published on

swt65.jpg
M14270
कुणकवण : येथे आगीत घराचे नुकसान झाले.

कुणकवण-बंदरवाडी येथे
घराला आग लागून नुकसान
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ : तालुक्यातील कुणकवण-बंदरवाडी येथील एका घराचे आगीत नुकसान झाले. यामध्ये सुमारे अर्धेअधिक घराचे नुकसान झाल्याचे चित्र होते. यामध्ये सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) सकाळच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेवेळी घरात कोणीही नव्हते.
याबाबतची माहिती अशीः तालुक्यातील कुणकवण-बंदरवाडी येथील संबंधित आज सकाळी बाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. त्यांच्या देवघरातील देवापुढे दिवा लावलेला होता. या दिव्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. याचदरम्यान बंदरवाडी येथील रहिवाशांना यांना घर पेटत असल्याचे दिसताच त्यांनी धावाधाव करून ग्रामस्थांच्या मदतीने घर आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घराचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. आगीत घराच्या छप्पराचे, घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. विजयदुर्ग पोलीसांनी घटनास्थळाची माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.