कुडाळात गुणवंतांचा
मनसेतर्फे सत्कार

कुडाळात गुणवंतांचा मनसेतर्फे सत्कार

Published on

१४२६५

कुडाळात गुणवंतांचा
मनसेतर्फे सत्कार
कुडाळ ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथे यावर्षीच्या दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी मनविसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे, मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी, माजी मनसे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब, माजी कुडाळ तालुका संपर्क प्रमूख हेमंत जाधव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी जिल्हा सचिव बाळा पावसकर, सचिन सावंत, प्रसाद गावडे, मनविसे तालुका संपर्क अध्यक्ष सर्वेश सावंत, कुडाळ मनविसे शहर अध्यक्ष गौरव कुडाळकर, शासकीय तंत्रनिकेतन मालवण युनिट अध्यक्ष यतिन माजगावकर तसेच सर्व मनसे आणि मनविसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


रेडी येथे रस्त्याची
बाजूपट्टी धोकादायक
सावंतवाडी ः रेडी मुख्य रस्त्याची बाजूपट्टी माती टाकून भरण्यात आली नसल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. रेडी मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. या रस्त्याची साईडपट्टी माती टाकून भरून घेणे आवश्यक होते; परंतु तसे न केल्याने वारंवार अपघात घडत आहेत. रस्त्याच्या बाजूला पावसाच्या पाण्यामुळे पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन या रस्त्याची बाजूपट्टी भरून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.