रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा टुडे 1 साठी

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा टुडे 1 साठी

Published on

- rat६p२२.jpg-३M१४३०३ अवधूत बाम
-----------

संगीतकार अवधूत बाम यांचा
कलाप्रवास उलगडणार दूरदर्शनवर
रत्नागिरी ः कोकणातील एकमेव ए ग्रेड संगीतकार अवधूत बाम यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ९ जुलैला रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत प्रक्षेपित होणार आहे. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमात बाम यांचा कलाप्रवास बघायला मिळणार आहे. बाम यांचा प्रवास, दिग्गज गायक, वादक यांचे त्यांना मिळालेलं मार्गदर्शन, त्यांचे गुरू इत्यादीबाबत दिलखुलास गप्पा या कार्यक्रमातून पाहायला मिळतील. त्यांच्याशी निवेदिका स्मिता गवाणकर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेल्या विविधांगी गीतरचना त्यांचे शिष्य स्वप्नील गोरे आणि आसावरी निगुडकर सादर करणार आहेत. त्यांना कोरस अनुया बाम यांनी दिला असून, रत्नागिरीतील हार्मोनियम वादक श्रीरंग जोगळेकर यांची हार्मोनियम तर रत्नागिरीतील तबलावादक हेरंब जोगळेकर तबलासाथ करणार आहेत. या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण १६ जुलैला सकाळी १० आणि संध्याकाळी ५ वा. सह्याद्री वाहिनीवर होणार आहे.
------------

क्रीडा साहित्य मागणीसाठी
नेहरू युवा केंद्रातर्फे आवाहन

रत्नागिरी ः केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना मोफत क्रीडा साहित्य वितरण करण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळांनी नेहरू युवा केंद्र कार्यालयास संपर्क साधावा. युवक मंडळ, क्रीडा मंडळ, महिला मंडळ यांनी क्रीडा साहित्याचा फॉर्म भरून द्यावा. क्रीडा साहित्यासाठी मंडळाचा शिक्का असणे आवशयक आहे. नवीन मंडळ संलग्न करण्यासाठी कमीत कमी सात सदस्य व त्या सदस्यांचे वय १५ ते २९ वर्षे, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे वय १८ ते २९ असावे. युवा मंडळ रजिस्टर किंवा अनरजिस्टर असले तरी चालेल. सर्व सदस्यांचे आधारकार्ड व सर्व सदस्य एकाच गावाचे असावेत. नेहरू युवा केंद्र, रत्नागिरी जिल्हा कार्यालय, शंकेश्वर नगर, ई-विंग बिल्डिंगच्यासमोर, गांधी कंपाऊंड, आरोग्यमंदिर या कार्यालयात संपर्क साधावा. निवड झालेल्या मंडळाना क्रीडा साहित्य वाटप केले जाईल, असे जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

मुंबईतील मेळाव्यानंतर
राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर

खेड ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ तारखेचा दौरा बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मुंबई मेळाव्यानंतर होईल अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली. मुंबईमध्ये मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करून मग चिपळूण दौरा करतील. त्यांचा सुधारित दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ८ तारखेचा दौरा रद्द करण्यात आलेला नाही असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांचा ८ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा होणार होता. यावेळी ते जिल्हा बैठक घेणार होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.