चिपळूण ः भूसंपादनाचा मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन

चिपळूण ः भूसंपादनाचा मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन

Published on

rat६p४.jpg ः M१४२४९ चिपळूण ः प्रांताधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेस पदाधिकारी.

भूसंपादनाचा मोबदला द्या अन्यथा तीव्र आंदोलन
चिपळूण काँग्रेस आक्रमक ; गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन
चिपळूण, ता. ६ ः गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमीनमालकांना अद्याप मोबदलाच मिळालेला नाही. हा मोबदला संबंधित जमीनमालकांना त्वरित द्या, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रांताधिकारी यांना निवेदन देत चिपळूण तालुका काँग्रेसने दिला आहे.
चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (ता. ६) सकाळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना चिपळूण तालुका काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्यालगतच्या अनेकांच्या जमिनींचे भूसंपादन शासनाकडून करण्यात आले आहे. या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या महामार्गासाठी भूसंपादन झाले असून प्रकल्पग्रस्तांना जागेपोटी योग्य मोबदला तातडीने अदा केला जाईल, असे आश्वासन काही महिन्यांपूर्वी शासनाकडून देण्यात आले होते. या मोबदल्यापोटी सुमारे ४० कोटी रुपये सरकारकडून आपल्या विभागाकडे आले आहेत. मात्र संबंधित जमीनमालकांना अजूनही त्यांच्या जागेचा मोबदला अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तरी संबंधित जमीनमालकांना भूसंपादनापोटी त्यांचा योग्य तो मोबदला तातडीने अदा करावा, या संदर्भात येत्या १५ दिवसांत त्वरित कार्यवाही सुरू न केल्यास चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
या वेळी प्रशांत यादव यांच्यासह शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, कबीर काद्री, सफा गोठे, निर्मला जाधव, श्रद्धा कदम, अ. ल. माळी, जनार्दन पवार, शमून घारे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.