सावंतवाडीत महावितरणचे ''तीनतेरा''

सावंतवाडीत महावितरणचे ''तीनतेरा''

Published on

swt619.jpg
14321
सावंतवाडीः महावितरणचे उपअभियंता संदीप भुरे यांच्याशी चर्चा करताना मनसेचे आशिष सुभेदार व अन्य.

सावंतवाडीत महावितरणचे ‘तीनतेरा’
मनसेचा अधिकाऱ्यांना जाबः महिन्यात कार्यवाही न झाल्यास आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचे तीनतेरा वाजले आहेत. माडखोल, ओटवणे, कोलगाव, सांगेली, मळगाव आदी बहूतांशी ग्रामीण भागात वीज तारा सातत्याने तुटून अपघाताचे प्रसंग उद्भवत आहेत. पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे व दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असून माणसे, जनावरे यांना जीव गमवावे लागत आहेत. येत्या महिनाभरात तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणा सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला. याबाबतचे निवेदन देखील उपअभियंता संदीप भुरे यांना देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने येथील वीज वितरण कार्यालयाचे उपअभियंता श्री. भुरे यांची भेट घेत सावंतवाडी शहरासहित तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढले. विजेच्या विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणा कोलमडली आहे. ग्रामीण भागात गंजलेल्या तारा तुटून पडणे, उघडे ट्रान्सफॉर्मर, मुख्य वाहिनीवर झाडी वाढणे, कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होणे, ट्रान्सफॉर्मर उडणे, चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित होणे, दिवसातून सातत्याने वीज जाणे अशा समस्या वाढत आहेत. पाहिल्यच पावसात ओटवणे येथे वीज तार तुटून पडल्यामुळे शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुलाला आपला जीव गमवावा लागला. शिवाय तालुक्यात वीज तारा तुटण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत.
मळगाव येथे आज वीज तार तुटून पडल्याने स्पर्श होऊन गाय मृत्युमुखी पडली. तर तेथील शेतकरी थोडक्यात बचावले. अशा भयानक परिस्थितीस लोकांना वीज कंपनीमुळे बळी पडावे लागत आहे. तालुक्यात अपुरा वायरमन स्टाफची समस्या कायम आहे. कंत्राटी पद्धतीने वायरमन घेऊन ते तातडीने गावात कार्यान्वित करावेत. यासाठी हालचाली होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात विजेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे. ठिकठिकाणी वीज तारा तुटण्याच्या घटना घडत आहेत. ओटवणे येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असून कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई दिली जावी व तालुक्यातील ढासळलेली वीज यंत्रणा सुरळीत केली जावी; अन्यथा तीव्र आंदोलन मनसेतर्फे छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष सुभेदार, संतोष भैरवकर, मंदार नाईक, शुभम सावंत, मनोज कांबळी, प्रणित तळकर, प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.