राजर्षी शाहू महाराजांना दोडामार्गात अभिवादन

राजर्षी शाहू महाराजांना दोडामार्गात अभिवादन

Published on

swt625.jpg
M14336
दोडामार्गः शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर.

राजर्षी शाहू यांना दोडामार्गात अभिवादन
दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. सुभाष सावंत यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शेती, उद्योग, शिक्षण या घटकांना प्रोत्साहन दिले. सर्व जाती-धर्मांच्या मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली. समता आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांच्या विचाराचे आपण वारसदार आहोत. त्यामुळे समाजात आणि जाती धर्मात संघर्ष होईल, असे काम करू नका, असे आवाहन त्यांनी केले. संस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे यांनी केले. आभार प्रा. डॉ. संजय खडपकर यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.