चिपळूण ः बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

चिपळूण ः बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

घरडाच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

४ लाख इतके सर्वाधिक पॅकेज ;कॅम्पस प्लेसमेंटमधून संधी

चिपळूण, ता. ६ ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. गेल्या वर्षभरात पार पडलेल्या कॅम्पस प्लेसमेंटच्या अनेक निवड फेऱ्यांमधून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दरवर्षी अनेक कंपन्याची कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया आयोजित केली जाते. यामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होतात. यावर्षी पार पडलेल्या या निवड प्रक्रियेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. यावर्षी घरडा केमिकल्स लिमिटेड, मेकरस्ट्राईव्ह, आर्गी प्लास्टिक, डुफ्लोन इंडस्ट्रिज, कोने क्रेन्स, क्यू. एच. तालब्रोस, जय हिंद इंडस्ट्रिज, प्रिवी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड अशा अनेक कंपन्यांची कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया पार पडली असून, मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४ लाख इतके सर्वाधिक पॅकेज मिळाले आहे.
घरडा महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतर्फे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकासासाठी व्याख्याने, बुद्धिमत्ता सराव परीक्षा, ग्रुप डिस्कशन, मॉक इंटरव्ह्यू अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. याच बरोबरीने वैयक्तिक समुपदेशनाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले जातात.
कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत डिझाइन आणि अॅनालिसिस सॉफ्टवेअरचे शिक्षण येथे दिले जाते. थ्रीडी प्रिंटर, सीएनसी असे अद्ययावत तंत्रज्ञान महाविद्यालयात उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा उत्तम फायदा होतो. त्याचबरोबर इंडस्ट्री व्हिजिट, इंटर्नशिप, ट्रेनिंग अशा विविध मार्गांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच कंपनीमध्ये कामाचा अनुभव दिला जातो. या सर्व उपक्रमांचा परिपाक मेकॅनिकल विभागाच्या उत्तम प्लेसमेंट्समधून दिसून येतो. यावर्षी विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे मेकनिकल विभागाचे प्रमुख डॉ. बी. ए. दानवडे, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील तसेच महाविद्यालय व्यवस्थापनातर्फे अभिनंदन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com