गुहागर ः

गुहागर ः

rat६p३१.jpg ः KOP२३M१४३४५ गुहागर ः सॅटेलाईट ट्रान्समिटर जोडलेल्या बागेश्रीसोबत डॉ. सुरेशकुमार.
rat६p३०.jpg ः ३M१४३४४ गुहागर ः गुहा व बागेश्रीचा प्रवास दाखवणारा नकाशा. (सौजन्य ः कांदळवन प्रतिष्ठान)

बागेश्री, गुहा कासवांच्या स्वभावात फरक
डॉ. सुरेश कुमार ः गुहा पुन्हा कोकण किनारी येणे शक्य


दृष्टिक्षेपात
* २३ फेब्रुवारीपासून समुद्री प्रवासाची नोंद
* उत्तरेकडे जाऊन पुन्हा दक्षिणेकडे मोर्चा
* बागेश्रीने श्रीलंकेचा समुद्रही पार केला
* गुहा अजूनही केरळ कर्नाटकच्या सीमेवर

गुहागर, ता. ६ ः बागेश्री आणि गुहा या दोन्ही कासवांच्या स्वभावात, वागण्यात मोठा फरक असल्याचे त्यांच्या प्रवासावरून जाणवते. बागेश्रीचा प्रवास केवळ अन्नासाठी नाही. इतक्यातच ती श्रीलंकेच्या पुढे का गेली, हे सांगता येणार नाही; मात्र गुहा पुन्हा कोकण किनारपट्टीवर येऊ शकेल, असे भारतीय वन्यजीव संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार यांनी सांगितले.
आजवरच्या प्रवासाबाबतची निरीक्षणे नोंदवताना शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार म्हणाले, माणसांप्रमाणेच प्राण्यांच्या स्वभावात, वागण्यात फरक असतो. तसाच फरक ऑलिव्ह रिडले मादी कासवांमध्येही आहे. ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे एकाच भागात स्थिर राहात नाहीत. त्यांचे निवासाचे क्षेत्र निश्चित नसते. या अभ्यासावरून गुहा व बागेश्रीचा प्रवास अन्नाच्या शोधात सुरू असेल, असा आमचा अंदाज होता. जेलिफिश, विशिष्ट जातींचे मासे व समुद्री शेवाळ हे अन्न जिथे मुबलक प्रमाणात मिळेल तिथे कासवे काही काळ थांबतील, असा तर्क होता. गुहाचा प्रवास या तर्काप्रमाणेच सुरू आहे; मात्र बागेश्रीने या तर्काला खोटे ठरवले. आपल्याला सातत्याने त्यांच्या प्रवासाची माहिती वर्षभर मिळत राहिली तर आणखी काही गोष्टीसमोर येतील. गुहा कदाचित पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर येईल, असा अंदाज आहे. बागेश्रीबाबत आत्ताच असा तर्क लावणे कठीण आहे.
गुहागरहून निघालेल्या बागेश्री या ऑलिव्ह रिडले कासवाने श्रीलंकेचा समुद्रही पार केला आहे. सध्या ती श्रीलंकेतील मातारा या किनारपट्टीच्या शहरापासून १२० किमी दूर आहे. गुहा मादी मात्र अजूनही केरळ कर्नाटकच्या सीमेवर रेंगाळली आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनप्रवासाची माहिती व्हावी, याचा कांदळवन प्रतिष्ठान, वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्याद्वारे अभ्यास सुरू आहे. या अभ्यासाचा भाग म्हणून फेब्रुवारी महिन्यात (२३ फेब्रुवारी) गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर जोडून समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे २३ फेब्रुवारीपासून त्यांच्या समुद्रातील प्रवासाची माहिती सातत्याने भारतीय वन्यजीव संस्थेला मिळत होती. गेल्या चार महिन्यात या दोन्ही कासवांनी सुरवातीला उत्तरेकडे जाऊन पुन्हा दक्षिणेकडील प्रवासाला सुरवात केली.


चौकट
१८ जूनला बागेश्री कन्याकुमारीजवळ
बागेश्रीचा प्रवास सातत्याने वेगाने दक्षिणेकडे जाणारा होता. १८ जूनला बागेश्री कन्याकुमारीजवळ होती. त्यानंतर तिचा प्रवास श्रीलंकेकडे सुरू झाला. ३ जुलैला बागेश्री श्रीलंकेतील गॅले शहराच्या सागरी हद्दीत होती तर ५ जुलैला श्रीलंकन सागरी हद्द पार करून बागेश्री मातारा या किनारपट्टीच्या शहरापासून १२० किमी दूर गेली आहे. तिने साधारणपणे १२०० कि.मी.चा प्रवास केला आहे. गुहा मादीचा प्रवास काहीसा रेंगाळणारा ठरला आहे. तिने ५०० ते ६०० कि.मी. प्रवास केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com