रत्नागिरी- रत्नागिरीत शनिवारी समान नागरी कायद्यावर व्याख्यान

रत्नागिरी- रत्नागिरीत शनिवारी समान नागरी कायद्यावर व्याख्यान

Published on

-rat६p२६.jpg-वM१४३४०
रत्नागिरी ः समान नागरी कायदा व्याख्यानासंदर्भात विश्व हिंदू परिषदेतर्फे व्याख्यान होणार आहे. त्याच्या प्रचाराच्या पत्रकार परिषदेवेळी पोस्टरचे अनावरण करताना जोगळेकर, अॅड. सचिन रेमणे, राजेंद्र पटवर्धन आदी.


समान नागरी कायद्यावर
रत्नागिरीत उद्या व्याख्यान
विहिंप, सकल हिंदू समाज ; कायदा समजून घेण्याकरिता प्रयत्न
रत्नागिरी, ता. ६ ः देशात समान नागरी कायदा लागू होण्यासाठी केंद्र सरकाराने पावले उचलली आहेत; परंतु हा कायदा नेमका काय आहे आणि त्याचा भारतीयांना काय फायदा होणार आहे याचा प्रचार करण्यासाठी समान नागरी कायदा या विषयावर रत्नागिरीमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. ८) सायंकाळी ४ वा. जयेश मंगल कार्यालयात कोल्हापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ प्रवीण देशपांडे व्याख्यान देणार आहेत.
विश्व हिंदू परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा आणि सकल हिंदू समाजाच्यावतीने या व्याख्यानाचे आयोजन केल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री कुमार जोगळेकर यांनी दिली. या प्रसंगी अॅड. सचिन रेमणे, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन आदी उपस्थित होते. या प्रसंगी जोगळेकर म्हणाले, समान नागरी कायदा-गरज, गैरसमज आणि वास्तव या विषयावर देशपांडे व्याख्यान देणार आहेत. देशाची वाढती लोकसंख्या पाहता सर्वधर्मियांना समान न्याय मिळणे आवश्यक आहे. काही लोकांना जास्त संधी व काहींना अजिबात संधी नाही, असे होता कामा नये. सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून समान नागरी कायदा होणे अत्यावश्यक आहे. हा कायदा समजून घेण्याकरिता जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे, असे आवाहन करत आहोत. या व्याख्यानादरम्यान उपस्थितांनाही या कायद्यासंदर्भात लिखित प्रश्न विचारता येतील. त्या शंकांचे निरसन करण्यात येईल. कायदा सर्वांनाच समान असतो. वेळोवेळी कायद्यात बदल होत असतात. विश्व हिंदू परिषद या समान नागरी कायद्यासंदर्भात समाजात जाऊन प्रबोधन करणार आहे. याकरिता इच्छुकांनादेखील कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आणि आवश्यक माहिती असल्यास ती देखील तिथे दिली जाणार आहे. या वेळी अॅड. रेमणे यांनी कायद्यासंदर्भात माहिती दिली. पत्रकार परिषदेवेळी अॅड. मीरा देसाई व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी चंद्रकांत राऊळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.