जिल्ह्यातील 159 शिक्षकांचे आज समुपदेशन

जिल्ह्यातील 159 शिक्षकांचे आज समुपदेशन

Published on

पान ३ साठी


जिल्ह्यातील १५९ शिक्षकांचे आज समुपदेशन
प्राथमिक शिक्षक; जिल्ह्यांतर्गत बदलीच्या सहाव्या टप्प्यात त्रुटी
रत्नागिरी, ता. ६ ः जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्प्यात पन्नासपेक्षा अधिक वय झालेल्या प्राथमिक शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय ग्रामविकास विभागाकडून घेण्यात आला आहे. दुर्गम भागात बदली झाल्याचा आक्षेप ग्राह्य धरत शासनाने त्या १५९ शिक्षकांना मुळ शाळा असलेल्या तालुक्यात समुपदेशनाने नियुक्ती द्या, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शुक्रवारी (ता. ७) समुपदेशन केले जाणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया जानेवारी २०२३ पर्यंत सुरू होती. सरल पोर्टलद्वारे झालेल्या पाच टप्प्यांपर्यंतच्या प्रक्रियेत शिक्षकांकडून आक्षेप घेण्यात आलेला नव्हता. सहाव्या टप्प्यात ५० पेक्षा अधिक वय झालेल्या काही शिक्षकांनी आपल्याला दुर्गम क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्ती दिल्याची तक्रार केली होती. त्या १५९ शिक्षकांनी बदली झालेल्या शाळेवर रूजू होण्यास नकार दिला होता. ४४ शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. काही शिक्षकांनी लोकप्रतिनिधींमार्फत जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक शिक्षक जिल्हा परिषद भवनात ठाण मांडून होते. बदल्यांवरील निर्णय हे ग्रामविकास विभागाकडून घेतले जातात. दोनच दिवसांपूर्वी आक्षेप घेणार्‍या त्या शिक्षकांना शुक्रवारी सकाळी ११ वा. जिल्हा परिषदेत समुपदेशनासाठी बोलावण्यात आले आहे. त्या शिक्षकांना सोयीच्या शाळा देण्यात येणार आहेत. बुधवारी याबाबत रितसर जि.प . प्रशासनाने पत्रक काढले आहे. त्या शिक्षकांना त्वरित बदली झालेल्या शाळेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया राबवताना सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांपुढे रिक्त शाळा ठेवण्यात येणार आहेत. त्यामधील शाळा निवडण्याची संधी शिक्षकांना आहे. जिल्ह्यातील दोन हजार पदे रिक्त असून, समानीकरणांतर्गत प्रत्येक तालुक्यातील १३ टक्के जागा नियुक्तीसाठी उपलब्ध राहणार नाहीत.

... त्या शिक्षकांचे
समायोजन करणार का?
शिक्षक बदली प्रक्रिया २०१९ मध्ये शिक्षकांना आपल्या तालुक्यातून अन्य तालुक्यात विस्थापित व्हावे लागले होते. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय झाला आहे. शिक्षक भरती लवकरच होईल. जिल्ह्यामध्ये रिक्त शाळांचे प्रमाण जास्त आहे तरी शिक्षक बदली २०१९ मधील शिक्षकांना विनाअट समायोजन प्रक्रिया करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.