चिपळूण ः समाजवादी कार्यकर्त्या आशाताई वाघ कालवश

चिपळूण ः समाजवादी कार्यकर्त्या आशाताई वाघ कालवश

Published on

फोटो - RATCHL६१.JPG ःKOP२३M१४३०७ चिपळूण ःआशाताई वाघ


समाजवादी कार्यकर्त्या
आशाताई वाघ कालवश
मृणालताई गोरेसह विविध आंदोलनांमध्ये सहभाग
चिपळूण, ता. ६ ः ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्या आशाताई वामन वाघ (९२) यांचे ४ जुलैला मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. समाजवादी विचारसणीच्या असलेल्या आशाताईंनी विविध आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या पश्चात उद्योगपती सतीश वाघ, अरूण वाघ, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
आशाताई वाघ मृणालताई गोरे यांच्या निष्ठावंत सहकारी होत्या. नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, बापूसाहेब काळदाते, जॉर्ज फर्नांडीस, शरद राव या सर्वांबरोबर विविध राजकीय घडामोडीमध्ये तसेच आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये मृणालताई गोरे यांच्याबरोबर पाणी आंदोलन, लाटणे मोर्चा, नागरी निवारा परिषद, महिला संघटन या सर्व कामांमध्ये सक्रिय होत्या. जोगेश्वरी पूर्व भागात त्यांनी जनता पार्टीतर्फे नगरसेवकपदी निवडणूक लढवली होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवी घेतली होती. त्यांचे समाजवादी विचारसरणीचे वाचन, अभ्यास असा सतत दांडगा व्यासंग होता. जोगेश्वरी पूर्व विभागात राष्ट्रसेवा दलाचे काम वर्षानुवर्षे त्यांच्या घरातूनच चालत असे. त्यांनी आपल्या मुलांना उद्योगांमध्ये सतत प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.