शृंगारतळी ः 446 जणांना विंचूदंश, 92 सर्पदंश, 323 श्वानदंश

शृंगारतळी ः 446 जणांना विंचूदंश, 92 सर्पदंश, 323 श्वानदंश

Published on

गुहागरात वर्षभरात ४४६ जणांना विंचूदंश
९२ सर्पदंश, ३२३ श्वानदंशांची नोंद ; मृत्यूचे प्रमाण शून्य
गुहागर ता. ६ ः तालुक्यात चालू वर्षात सुमारे ४४६ जणांना विंचूदंशाची लागण झाली असून, ९२ जणांना सर्पदंश लागण झाली तर ३२३ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगिड यांनी दिली. सुदैवाने, वर्षभरात विविध प्रकारच्या कोणत्याही दंशामध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याने वेळेत योग्य ते उपचार झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
ग्रामीण भागात साधारणतः भातकापणी हंगामात विंचू व सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. साधारणतः ऑक्टोबर ते मे असा उन्हाचा हंगाम असल्याने या दरम्यान ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढते असते. यावर्षी गुहागर तालुक्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सर्प, विंचू, कुत्रा आणि इतर दंश आकडेवारी गुहागर तालुका आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या आकडेवारीनुसार तळवली प्राथमिक आरोग्यकेंद्रात ९ जणांना सर्पदंश, १७९ जणांना विंचूदंश, ६५ जणांना श्वानदंश, हेदवी प्राथमिक आरोग्यकेंद्रात २१ जणांना सर्पदंश, ८७ जणांना विंचूदंश, ६१ जणांना श्वानदंश, ४१ जणांना इतर दंश झाला आहे. कोळवली प्राथमिक आरोग्यकेंद्रात २ जणांना सर्पदंश, ७ जणांना विंचूदंश, २२ जणांना श्वानदंश तर २४ जणांना इतरदंश झाला. आबलोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात ५१ जणांना सर्पदंश, ११४ जणांना विंचूदंश, १०९ जणांना श्वानदंश, ८५ जणांना इतरदंश झाला. चिखली प्राथमिक आरोग्यकेंद्रात ९ जणांना सर्पदंश, ५९ जणांना विंचूदंश, ६६ जणांना श्वानदंश, १७ जणांना मांजर दंश, एकाला माकड दंश तर २९ जणांना इतर दंश झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.