अभ्यंकर मूकबधीर विद्यालयाचा 42 वा वर्धापनदिन साजरा

अभ्यंकर मूकबधीर विद्यालयाचा 42 वा वर्धापनदिन साजरा

rat७p४६.jpg-
M१४६३६
रत्नागिरी ः अभ्यंकर मूकबधीर विद्यालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयेंद्र जाधव. सोबत दीपक आंबवलेकर, भावे, रजपूत आदी.
-----------
अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा
४२ वा वर्धापनदिन साजरा
रत्नागिरी, ता. ८ः दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधीर विद्यालयाचा ४२वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयेंद्र जाधव व समाजकल्याण अधिकारी दीपक आंबवलेकर उपस्थित होते.
मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी संस्थेच्यावतीने व विद्यालयाच्यावतीने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रासाठी पुस्तके, वह्या, गणवेश, खेळणी व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण आकाश भोसले, सुजल बेनेरे, शुभ्रा देवळेकर, श्रुती गावडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शासकीय रेखाकला परीक्षेत कशिश नदाफ, ऋतुजा सातोपे, इरझान शिरगांवकर, श्रुती बोरकर, हबीबा शेख, कोमल शिनगारे, सोहम आलिम, हसीब मालगुंडकर या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ऋतुजा सातोपे हिने अभिसार फाउंडेशन ऑल इंडियातर्फे फॅशन डिझाईनचा ४५ दिवसांचा कोर्स पूर्ण केला. तिचाही सत्कार केला. चालू वर्षी नवीन वैवाहिक दाम्पत्याचे स्वागत केले. या सर्वांसाठी विशिष्ट देणगीदारांनी देणगी दिली होती.
प्रमुख पाहुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सांगितले, अपंग हा कमीपणा नसून सर्वांसोबत जगणे आवश्यक आहे. त्यांनी शाळेची भरपूर प्रशंसा केली. त्यांनी जिल्हा परिषदेमधील काही योजनांची माहिती पालकांना समजावून सांगितली. ते पालकांना म्हणाले , आपल्या दिव्यांग मुलांसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडे काही निधी असतो. आपण तो निधी आपल्या मुलांसाठी उपयुक्त कसा करता येईल, यांचा विचार करावा.
या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष अॅड. भावे, शाळा व्यवस्थापक राजाराम पानगले, पालक प्रतिनिधी सुर्वे उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश घवाळी यांनी केले. कसबे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com