समुद्रातील आपत्तीबाबत मच्छीमारांना सुरक्षा प्रशिक्षण

समुद्रातील आपत्तीबाबत मच्छीमारांना सुरक्षा प्रशिक्षण

rat8p1.jpg
M14739
गावडेआंबेरे (ता. रत्नागिरी)ः मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना मान्यवर.
------------
समुद्रातील आपत्तीबाबत मच्छीमारांना सुरक्षा प्रशिक्षण
गावडेआंबेरेत कार्यक्रम; हृदयविकार, कृत्रिम श्वासोच्छवासाचे प्रात्यक्षिक
पावस, ता. ८ः मच्छीमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मच्छीमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. अशा आपत्तीच्यावेळी मच्छीमारांनी नेमके काय केले पाहिजे, याबाबत सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण गावडेआंबेरे येथे दाखविण्यात आले.
हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे आदी आपत्तीमध्ये व्यवस्थापन कसे करावे याबद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छीमारांना सागरी सुरक्षेचे महत्व ओळखून गावडेआंबेरे येथील मच्छीारांना रिलायन्स फाउंडेशन, सर्वोदय मच्छीमार सेवा सहकारी संस्था, समर्थ साई मच्छीमार सेवा सहकारी संस्था, शिवसागर मच्छीमार सेवा सहकारी संस्था, सागरी मच्छीमार संघटना व नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे हे प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, कार्यक्रम सहायिका श्रीमती प्रणाली गोरे, नागरी संरक्षण केंद्राचे सहाय्यक उपनियंत्रक ए. एन. गधरी, मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी उपस्थित होते.
श्री. गधरी यांनी समुद्रामध्ये मच्छीमारांना हृदयविकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासह सांगितल्या. तसेच कृत्रिम श्वासोच्छवास, सीपीआर म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्राथमिक उपचार कसे द्यावेत याची माहिती दिली.
चिन्मय जोशी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, गट अपघात विमा, सिंधुरत्न योजनेबाबत माहिती दिली. सर्व क्रियाशील मच्छीमारांना गट अपघात विम्याचे महत्व सांगून विम्यासाठी लागणारी माहिती मत्स्य विभागाकडे तत्काळ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला सर्वोदयचे संस्थापकीय अध्यक्ष यशवंत डोर्लेकर, चेअरमन वसंत नाटेकर, समर्थ साई संस्थेचे चेअरमन ओंकार खडपे, शिवसागर संस्थेचे सचिव अविनाश डोर्लेकर, सागरी मच्छीमार संघटनेचे कार्यकर्ते संजय बुवा डोर्लेकर, सरपंच लक्ष्मण सारंग, उपसरपंच वैभव नाटेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com