मंडणगड - शासन आपल्या दारीमध्ये विवीध दाखल्यांचे वितरण

मंडणगड - शासन आपल्या दारीमध्ये विवीध दाखल्यांचे वितरण

Published on

Rat८p११.jpg
M१४७६४
कादवणः शासन आपल्या दारी योजनेंर्तगत कादवण येथे दाखले वितरण करताना तहसीलदार तानाजी शेजाळ व अधिकारी.
----------
शासन आपल्या दारीमध्ये
विविध दाखल्यांचे वितरण
कादवनला कार्यक्रम ; नवीन प्रस्ताव प्रक्रिया
मंडणगड, ता. ८ः शासन आपल्या दारी या उपक्रमाअंर्तगत मंडणगड तहसील कार्यालयाचे लाटवण महसूल मंडळाच्या वतीने तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कादवण समाजमंदिरात दाखले वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिकांनी मागणी केलेली नवे प्रस्तावही स्वीकारण्यात आले.
कार्यक्रमाला तहसीलदार तानाजी शेजाळ, अव्वल कारकून बिच्चेवार, मंडळ अधिकारी नीलेश गोडगासे, प्रकाश साळवी, एस. के. गुरव, तलाठी सय्यद, मुल्ला, ठोंबर, अव्वल कारकून मयूर पोळ, सेतू कर्मचारी किरण चव्हाण, निवडणूक कर्मचारी कुणाल नाकती, राजेंद्र सोंडकर, दीपक मालुसरे, विजय खैरे, सरपंच-उपसरपंच पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महसूल मंडळाच्या कार्यक्षेत्रातील ३१ नागरिकांना उत्पनांचे दाखल्याचे वितरण करण्यात आले. १७ जातीचे दाखले वितरण करण्यात आले. १२ आधारकार्डांची दुरुस्ती करण्यात आली. शासनाच्या विविध लाभाच्या आर्थिक साहाय्य योजनांची २१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. पी. एम. किसान योजनेची ४ प्रकरणाची नोंदणी करण्यात आली. उत्पन्नाच्या दाखला मागणीचे नवीन २८ प्रस्ताव स्वीकारण्यात आले. याशिवाय ओबीसी जातीचा दाखला मागणीचे २ नवीन प्रस्ताव स्वीकारण्यात आले. रेशनकार्डावर नावे वाढवण्याचे २ नवीन प्रस्ताव याचबरोबर रेशनकार्डाचे नव्याने मागणीचा १ नवीन प्रस्ताव या वेळी स्वीकारण्यात आला. नवे मागणी अर्जाची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे या वेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.