तलाठी भास्कर, गोरे यांचा
मळेवाडवासीयांतर्फे सत्कार

तलाठी भास्कर, गोरे यांचा मळेवाडवासीयांतर्फे सत्कार

14831
मळेवाड ः अनुजा भास्कर, सचिन गोरे यांचा सत्कार करण्यात आला.

तलाठी भास्कर, गोरे यांचा
मळेवाडवासीयांतर्फे सत्कार
सावंतवाडी, ता. ८ ः मळेवाड-कोंडुरे गावासाठी स्वतंत्र तलाठी म्हणून रुजू झालेल्या अनुजा भास्कर आणि यापूर्वी प्रभारी तलाठी म्हणून कार्यरत असणारे सचिन गोरे या दोघांचा मळेवाड सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मळेवाड गावाचा तलाठी पदाचा कार्यभार गेली दीड-पावणे दोन वर्षे मळगाव तलाठी सचिन गोरे यांच्याकडे होता. मळेवाड तलाठी म्हणून काम करताना गोरे यांनी चांगली सेवा शेतकरी व ग्रामस्थांना दिली. यानिमत्त त्यांचा सरपंच पार्सेकर व उपसरपंच मराठे यांनी शाल, श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन सत्कार केला. मळेवाडसाठी कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी उपसरपंच मराठे यांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करत पाठपुरावा केला होता. नवीन तलाठी नेमणुकीमध्ये प्रांताधिकारी पानवेकर यांनी मळेवाड-कोंडुरेसाठी स्वतंत्र तलाठी म्हणून अनुजा भास्कर यांची नियुक्ती केली. ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक व अमोल नाईक यांनी तलाठी भास्कर यांचे सुपारीचे रोप देऊन स्वागत केले. गोरे यांनी ज्याप्रमाणे ग्रामस्थांना सेवा दिली, त्याप्रमाणे नूतन तलाठी भास्कर यांनीही द्यावी, अशी अपेक्षा मराठे यांनी व्यक्त केली. यावेळी मोहन गावडे, सुनील नाईक, सुनील तिरोडकर, रवींद्र नाईक, प्रकाश नाईक, योगेश कारुडेकर, रमेश कारुडेकर, कृष्णा इन्सुलकर, विलास सावंत, दाजी उक्षेकर आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
--

14847
चंद्रकांत पाळेकर, श्रीपाद पारकर

‘देवदुर्ग’च्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाळेकर
देवगड ः येथील देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पाळेकर, तर उपाध्यक्षपदी श्रीपाद पारकर यांची फेरनिवड झाली. २०२३ ते २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळ निवडण्यात आले आहे. संस्था कार्यालयात अध्यासी अधिकारी सहायक निबंधक एम. एस. धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया झाली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नूतन संचालक तसेच संस्था सचिव कृष्णा परब, मदतनीस सुधीर देवगडकर आदी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष-चंद्रकांत पाळेकर, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, सदस्य-नंदकुमार घाटे, तुषार पारकर, दिनेश घाटे, उत्तम पोकळे, गौरव पारकर, महादेव आचरेकर, गुरुनाथ वाडेकर, सविता पाळेकर, सुमाली निकम, पद्माकर देवगडकर, वसंत मोहिते यांचा समावेश आहे.
....................
इन्सुलीत उद्या धार्मिक कार्यक्रम
बांदा ः इन्सुली-कोठावळेबांध येथील श्री देव पाटेकर मंदिरात सग्रह सवास्तू शिखर कलश प्रतिष्ठा समारंभ १० व ११ जुलै या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. १०) श्री गणेश पूजन, पुण्याहवचन, कार्यारंभ, देवता आवाहन, पूजन, हवन, कलश शुद्धी होणार आहे. मंगळवारी (ता. ११) आवाहित देवता पूजन, शिखर कलश प्रतिष्ठा, पूर्णाहुती आदी धार्मिक विधी होणार आहेत. यानिमित्त श्रींची महापूजा, महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री स्थानिकांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समिती व समस्त इन्सुली कोठावळेबांध ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com