चिपळूण ः परशुराम घाटात पुन्हा कोसळली दरड

चिपळूण ः परशुराम घाटात पुन्हा कोसळली दरड

Published on

-ratchl८१.jpg
14841
चिपळूण ः परशुराम घाटात कोसळलेली दरड.

-rat८p३७.jpg
14848
चिपळूण : परशुराम घाटात कोसळलेली दरड जेसीबीने बाजूला करण्याचे काम सुरू होते.


परशुराम घाटात पुन्हा कोसळली दरड

आठवड्यातील तिसरी घटना; संरक्षक भिंतीला दणका

चिपळूण, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आठवड्यातच तिसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडल्याने वाहनचालक व प्रवासी तसेच पेढे-परशुरामवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने, घाट बाजूकडील एकेरी मार्गावर दरड कोसळल्याने कोणताही अपघात घटना घडला नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. मात्र, पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने घाट बाजूकडील एकेरी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे; तर पेढे बाजूकडील एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे; परंतु आठवड्याभरातच तीनवेळा घाट बाजूकडील एकेरी मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये शुक्रवारी रात्री तिसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये संरक्षक भिंतीलादेखील दणका बसला आहे. परशुराम घाटात अर्धवट स्थितीत डोंगरकटाई केल्यामुळे दरड कोसळण्याची घटना घडत आहे. शुक्रवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर ठेकेदार कंपनीने शनिवारी दरड बाजूला करण्यास सुरुवात केली. मात्र, पेढे बाजूकडील एकेरी मार्गावरून वाहतूक सुरळीत राहिल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. परशुराम घाटात डोंगरकटाई करतेवेळी जिथे पोकलेन सापडला होता तेथून काही अंतरावरच ही दरड कोसळली आहे.
दरड कोसळण्याच्या घटनांबाबत पेढे, परशुराम तसेच वाहनचालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कंपनीला लोकांच्या जीवाशी काही पडलेले नाही. या गटात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या घाटात दुर्घटना घडल्यास ठेकेदार कंपनीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.