जामसंडेत विचित्र अपघात

जामसंडेत विचित्र अपघात

Published on

14816
जामसंडे ः येथे एसटीचा अपघात झाला.

जामसंडेत विचित्र अपघात

दोघे जखमी; एसटीच्या धडकेने शेड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः जामसंडे येथे झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. तेजस तुषार बांदेकर (वय २५) आणि तन्मय तुषार बांदेकर (वय २०, दोघे रा. आनंदवाडी) अशी जखमींची नावे आहेत. यातील एसटी रस्त्याकडेला जाऊन एका दुकानासमोरील शेडला धडकल्याने शेड कोसळून नुकसान झाले. यामध्ये दुचाकीचेही नुकसान झाले. हा अपघात आज सकाळच्या सुमारास जामसंडे येथील वळकूवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक घडला. जखमींना प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातप्रकरणी एसटी चालकाविरुध्द येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील एसटी आगाराची देवगड-वानिवडे ही बसफेरी घेऊन चालक संजय रवींद्र पाटील (वय ३५) आणि वाहक बी. डी. कदम जात होते. गाडी देवगड-नांदगाव रस्त्यावरून जात असताना जामसंडे येथील वळकूवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला, हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. एसटी रस्त्याकडेला जाऊन एका दुकानासमोर बांधण्यात आलेल्या शेडला धडकली. यामध्ये शेड कोसळून नुकसान झाले. दुचाकी शेडखाली सापडल्याचे चित्र होते. प्राथमिक अंदाजानुसार एसटीची शेडला धडक बसली. यात शेड कोसळली; मात्र दुचाकी आधी एसटीला धडकली की थेट शेडखालीच सापडल्याने नुकसानग्रस्त झाली, हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, पोलिस हवालदार अमित हळदणकर, पोलिस हवालदार आशिष कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी दोघांनाही कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
--
शेडचे मोठे नुकसान
पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी केली. अपघातात शेडचे मोठे नुकसान झाले. एसटीच्या पुढील दर्शनी भागाचेही नुकसान झाले. अपघातस्थळी मोठी गर्दी जमली होती. अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातप्रकरणी एसटी चालकाविरुध्द येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार राजन जाधव करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.