चिपळूणच्या राष्ट्रवादीत दोन गट

चिपळूणच्या राष्ट्रवादीत दोन गट

चिपळूणच्या राष्ट्रवादीत दोन गट
रमेश कदम समर्थकांचा १७ ला मेळावा; शक्तीप्रदर्शन करणार
चिपळूण, ता. ८ः आमदार शेखर निकम यांच्या बैठकीनंतर माजी आमदार रमेश कदम यांनीही आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांना कळवला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. १७ जुलैला पक्षाचा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचे बैठकीत ठरले आहे.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पक्षाचे विद्यमान पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज रमेश कदम यांनी आज बैठक घेतल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि रमेश कदम यांना मानणारे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला. त्यामुळे चिपळूणच्या राष्ट्रवादीत आता दोन गट पडल्याचे समोर आले. कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत माजी नगरसेवक शिरीष काटकर, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, हिंदुराव पवार, सतीश खेडेकर, माजी नगरसेवक अविनाश केळकर रमेश खटे, डॉ. अब्बास जवले, डॉ. रेहमत जबले, माजी नगरसेवक सुरेश चिपळूणकर आदी उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार कदम यांनी राज्यातील सद्यःस्थिती आणि राष्ट्रवादीतील सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आपण घेतलेला निर्णय योग्य असून त्या निर्णयाशी आम्हीही कायम आहोत. पश्चात उहून भाजपला सहकार्य करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे पवारसाहेब यांच्या पाठीशी आम्ही कायम राहू, असे सांगितले. यानंतर झालेल्या चर्चेत शहराचा मेळावा १७ ला घेण्याचे सर्वानुमते उरले. या मेळाव्याच्या तयारीची जबाबदारी पदाधिकाऱ्यावर सोडण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com