कृषी अधिकारी गोरेंकडून
बांद्यात शेतीची प्रात्यक्षिके

कृषी अधिकारी गोरेंकडून बांद्यात शेतीची प्रात्यक्षिके

14876
बांदा ः येथे शेतात नांगरणी करताना तालुका कृषी अधिकारी जी. एस. गोरे. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

कृषी अधिकारी गोरेंकडून
बांद्यात शेतीची प्रात्यक्षिके
बांदा ः बांदा येथे कृषी विभागातर्फे प्रमोद देसाई यांच्या शेतात सिंधुरत्न समृद्धी योजने अंतर्गत मशागतीसह श्री पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी जी. एस. गोरे यांनी स्वतः बैलजोडी चालवित मशागत करून बांदा मंडलातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत अधिक उत्पादन देणाऱ्या भात पीक ‘श्री’ पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच डेगवे येथील दादा भालचंद्र देसाई यांच्या क्षेत्रात काजू फळबाग लागवडीचा प्रारंभ केला. नारळ व सुपारी बागेला भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी बांदा मंडळ कृषी अधिकारी यू. जी. भुईंबर, बांदा कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे, श्री. सरगुरू, डेगवे कृषी सहाय्यक अतुल माळी, तांबुळी कृषी सहाय्यक श्री. निकम, शेर्ला कृषी सहाय्यक बेळगुंदकर, नेतर्डे कृषी सहाय्यक सावंत आदींसह शेतकरी प्रमोद देसाई, दादा देसाई, आबा देसाई आदी उपस्थित होते. प्रकाश घाडगे आणि कृषी सहायक अतुल माळी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
.............
तळवणेत आज गुरुपौर्णिमा उत्सव
बांदा ः तळवणे येथील श्री म. परशुराम भारती महाराज मठात श्री स्वामी राजेंद्र भारती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (ता. ९) गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली संगीत विद्यालय व गुरुकृपा संगीत विद्यालय, तळवणे प्रशिक्षक भावेश राणे, संतोष गोडकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी दहाला कार्यक्रमाचा दीपप्रज्वलनने प्रारंभ, मान्यवरांचे स्वागत, कार्यक्रम स्थळी गुरूंचे मार्गदर्शन, मनोगत, विद्यार्थ्यांचे गायन, वादन, पखवाज, तबला, सोलो, गुरूपूजन, दिग्गज कलाकारांचे गायन आदी कार्यक्रम होणार आहेत. रसिक प्रेक्षक, ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
--
आंबा बागायतदारांची बुधवारी वेंगुर्लेत सभा
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार संघाची सभा बुधवारी (ता.१२) सकाळी अकराला वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेत यावर्षी आंबा पीक १५ टक्के असतानाही शासनाने अद्यापपर्यंत नुकसान भरपाई जाहीर न केल्याने पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे, विमा देण्यास विलंब होत असल्याने रिलायन्स कंपनीस जाब विचारणे, संघटनेचे जिल्हा कार्यक्षेत्र प्रभावी करणे, सदस्य वाढविणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे सचिव अ‍ॅड. प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.
--
निवृत्त कर्मचाऱ्यांची मंगळवारी सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी, दोडामार्ग तालुका निवृत्त कर्मचारी संघाची मासिक सभा मंगळवारी (ता. ११) जुलैला सकाळी साडेदहाला ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालय, जुना शिरोडा नाका, सालईवाडा येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व संचालक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.
--
पूनम राणे वेंगुर्लेच्या गटविकास अधिकारी
वेंगुर्ले ः वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन भोई हे निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी जिल्हा परिषद ठाणेच्या पूनम राणे यांची परिविक्षाधीन गटविकास अधिकारी (गट अ) म्हणून नियुक्ती झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com