दिलीप गुराम यांच्याकडून
शालेय विद्यार्थिनीस मदत

दिलीप गुराम यांच्याकडून शालेय विद्यार्थिनीस मदत

15166
कट्टा ः सिद्धी जांभवडेकर हिला मदत देताना दिलीप गुराम. सोबत मुख्याध्यापक संजय नाईक व अन्य.

दिलीप गुराम यांच्याकडून
शालेय विद्यार्थिनीस मदत
ओरोस, ता. १० ः गुरामवाडी (ता. मालवण) येथील रहिवाशी दिलीप गुराम (सध्या रा. मुंबई) यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीची होतकरू विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला आपले वडील (कै.) भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ दोन वर्षांच्या शैक्षणिक खर्चासाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
सिद्धीला दहावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के गुण मिळाले आहेत. नम्र आणि हुशार असलेल्या सिद्धीच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक पाठबळ मिळाल्याने तिच्या आईने व कुटुंबीयांनी गुराम यांचे आभार मानले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय नाईक व सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही शाळेसाठी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी गुराम यांनी दिली. गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सुनील गुराम यांनी दिलीप गुराम यांना याबाबत आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिलीप गुराम यांनी सिद्धीला सहकार्य केले. दिलीप गुराम यांनी यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नाईक यांचा सन्मान केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com