रत्नागिरी- सॅटर्डे क्लबतर्फे पाण्याच्या टाक्या

रत्नागिरी- सॅटर्डे क्लबतर्फे पाण्याच्या टाक्या

फोटो ओळी
- rat१०p३.jpg-व
रत्नागिरी ः सॅटर्डे क्लबतर्फे पावस येथील वृद्धाश्रमाला पाण्याची साठवण टाकी भेट देण्यात आली. त्या प्रसंगी क्लब आणि आश्रमाचे पदाधिकारी.
-----------

काही सुखद-------लोगो

वृद्धाश्रम, मतिमंदांच्या संस्थेला पाण्याच्या टाक्या

सॅटर्डे क्लबचा पुढाकार; वर्गणी काढून टाक्यांची खरेदी
रत्नागिरी, ता. १० ः सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी विभागातर्फे पावस येथील अनुसुया आनंदी महिला वृद्धाश्रम तसेच रत्नागिरीतील मतिमंदांच्या आशादीप संस्थेला पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.
सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी विभागाला पाच वर्षे झाली. संस्थापक माधवराव भिडे यांचा स्मृतिदिन कृतज्ञता दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्त सॅटर्डे क्लबच्या सर्व सदस्यांनी वर्गणी काढून टाक्यांची खरेदी केली. या दोन्ही संस्थांना पाणी साठवण्यासाठी टाक्यांची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी संस्थांना दोन हजार लिटरची प्रत्येकी एक टाकी देण्यात आली. पावसच्या महिला वृद्धाश्रमात ११ महिला असून त्यांच्यासह विश्वस्त चेतना खातू यांच्या उपस्थितीत टाक्या देण्यात आल्या. या वेळी क्लबचे अध्यक्ष प्रतीक कळंबटे, सचिव प्रकाश भुरवणे, खजिनदार सागर वायंगणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका अरुणा कदम आणि मदतनीस ज्योती शिंदे, नैना शेडगे, सुरेखा नैकर, दीपा चव्हाण यांना साडीचोळीची भेटही सॅटर्डे क्लबतर्फे देण्यात आली. त्यानंतर एमआयडीसीतील आशादीप मतिमंद मुलांच्या पालक संस्थेत संस्थापक संचालक दिलीप रेडकर यांच्याकडे पाण्याची टाकी सुपूर्द करण्यात आली. संस्थेचे चंद्रमोहन देसाई, संजय वैशंपायन, क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते. या दोन्ही संस्थांनी सॅटर्डे क्लबचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com