वेंगुर्ले ‘रोटरी’च्या अध्यक्षपदी वजराटकर

वेंगुर्ले ‘रोटरी’च्या अध्यक्षपदी वजराटकर

15191
राजू वजराटकर, योगेश नाईक, प्रथमेश नाईक, पंकज शिरसाट

वेंगुर्ले ‘रोटरी’च्या अध्यक्षपदी वजराटकर

नूतन कार्यकारिणी; अॅड. नाईक खजिनदार, सचिवपदी नाईक

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनची २०२३-२४ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शंकर उर्फ राजू वजराटकर, सचिवपदी योगेश नाईक, उपाध्यक्षपदी अॅड. प्रथमेश नाईक, खजिनदारपदी पंकज शिरसाट यांची एकमताने निवड करण्यात आली.
रोटरी क्लब व वेंगुर्ले मिडटाऊनची बोर्ड ऑफ डिरेक्टरची सभा नुकतीच येथील स्वामिनी मंगल कार्यालयात झाली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आदींसह संपूर्ण तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये सार्जंट अॅट आर्म्स आनंद बोवलेकर, क्लब सर्व्हिस राजेश घाटवळ, व्होकेशनल सर्व्हिस गणेश अंधारी, कम्युनिटी सर्व्हिस संजय पुनाळेकर, यूथ सर्व्हिस मृणाल परब, इंटरनॅशनल सर्व्हिस दीपक ठाकूर, स्पोर्ट्स डिरेक्टर मुकुल सातार्डेकर, टीआरएफ चेअरमन दिलीप गिरप, पोलिओ प्लस चेअरमन सदाशिव भेंडवडे, लिटरसी चेअरमन नितीन कुलकर्णी, पब्लिक इमेज चेअरमन सचिन वालावलकर, सर्व्हिस प्रोजेस्ट पीटर रोड्रिग्ज, टीच अँड विन वसंतराव पाटोळे, बुलेटिन दिलीप शितोळे, आनंद बांदेकर, एमएचएम डॉ. राजेश्वर उबाळे, पर्यावरण श्वेता हुले, मेम्बरशिप चेअरमन दादा साळगावकर, हायजीन अँड सॅनिटायझेशन अनमोल गिरप आदींसह सर्व पदांचे सदस्य निवडण्यात आले.
...............
चौकट
पदग्रहण सोहळा शुक्रवारी वेंगुर्लेत
सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा १४ जुलैला येथील स्वामिनी मंगल कार्यालयात (पाटकर हायस्कूल नजीक) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट शरद पै यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, झोनल को-ऑर्डिनेटर प्रणय तेली, गव्हर्नर एरिया गजानन कांदळगावकर, असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, असिस्टंट गव्हर्नर राजन बोभाटे यांच्या उपस्थितीत होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com