गोवेरीत कोसळलेल्या साकवाची
आमदार वैभव नाईकांकडून पाहणी

गोवेरीत कोसळलेल्या साकवाची आमदार वैभव नाईकांकडून पाहणी

15193
गोवेरी ः येथील पडलेल्या लोखंडी साकवाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. (छायाचित्र ः अजय सावंत)

गोवेरीत कोसळलेल्या साकवाची
आमदार वैभव नाईकांकडून पाहणी
कुडाळ, ता. १० ः गोवेरी-भगतवाडी (ता.कुडाळ) येथील ओहोळावरील पडलेल्या लोखंडी साकवाची पाहणी आज आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली. यावेळी ग्रामस्थांनी साकव दुरुस्तीची मागणी केली. आमदार नाईक यांनी कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क करत तात्पुरत्या स्वरुपात लोकांची जाण्यायेण्याची व्यवस्था करण्यासह जिल्हा नियोजनमधून नवीन साकवासाठी प्रस्ताव करण्याची सूचना केली.
गोवेरी-भगतवाडी ओहोळावरील लोखंडी साकव काल (ता. ९) सायंकाळी कोसळला. यादरम्यान साकवावरून जाणारे पाच जण पाण्यात पडून जखमी झाले. या जखमींची देखील आमदार नाईक यांनी विचारपूस केली. यावेळी ठाकरे गट शिवसेनेचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता प्रीतम पवार, उपअभियंता राजेंद्र कुलांगे, गोवेरी सरपंच दशरथ परब, स्वरा गावडे, एम. बी. गावडे, उदय भगत, शिबा खान, उमेश घाटकर, राजेंद्र राऊळ, सत्यवान हरमलकर, राजन परब, बाळकृष्ण केळुसकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com