रत्नागिरी- ग्राहक नक्की करून नियोजन करावे

रत्नागिरी- ग्राहक नक्की करून नियोजन करावे

Published on

फोटो ओळी
-rat१०p४.jpg-KOP२३M१५१५४ रत्नागिरी : सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी विभागाचा पाचवा वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थित मान्यवर पाहुणे उज्ज्वल साठे यांच्यासमवेत पदाधिकारी.


ग्राहक नक्की करून नियोजन करावे

उज्ज्वल साठे ; सॅटर्डे क्लबचा पाचवा वर्धापनदिन
रत्नागिरी, ता. १० : व्यावसायिकांनी आधी आपला ग्राहक नक्की करावा. ग्राहकाला जे अपेक्षित असेल ते देण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करावा. त्यादृष्टीने नियोजन करावे आणि त्यानुसार वाटचाल करावी. तरच उद्योग यशस्वी होऊ शकतो. व्यावसायिक जर दैनंदिन व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात व्यवस्थापकाप्रमाणे अडकून राहिलात तर ती त्याची नोकरी ठरते. तसे न करता त्यांनी सर्व कामे कर्मचाऱ्यांकडून करून घेतली पाहिजेत आणि आपला वेळ व्यवसायाचे धोरण आणि प्रगतीची आखणी करण्यासाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन सांगलीतील चिंतामणी मोटर्सचे संचालक उज्ज्वल साठे यांनी व्यक्त केले. सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी विभागाच्या पाचव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
श्री. साठे म्हणाले, ‘व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात केवळ गुंतवणूक करावी. दैनंदिन व्यवस्थापकीय कामकाजात गुंतून राहू नये. तसे झाले तरच व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. व्यवसायासाठी, कौटुंबिक खर्चासाठी तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून द्यावयाच्या निधीचेही नियोजन करावे.
या वेळी गुहागर येथील खातू मसाले उद्योगाचे प्रमुख शाळिग्राम खातू यांची मुलाखत पत्रकार प्रमोद कोनकर यांनी घेतली. शून्यातून निर्माण केलेल्या आणि आता सर्वत्र पसरलेल्या खातू मसाले उद्योगाची वाटचाल श्री. खातू यांनी या वेळी उलगडून दाखवली.’
शासनाच्या विविध योजनांचा उपयोग उद्योजक आणि व्यावसायिकांनी करून घ्यावा. अनेक प्रकारचे अनुदान तसेच वित्तपुरवठ्यासाठी या योजना उपयुक्त आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी दिली. जागृत मोटर्सच्या संचालिका रेश्मा जोशी यांनी सांगितले की उद्दिष्ट निश्चित केले आणि प्रामाणिकपणे वाटचाल केली, तर व्यावसायिक यश निश्चितपणे मिळू शकते. तशी मानसिकता प्रत्येकाने तयार केली पाहिजे. त्यातून अनेकांना चांगला रोजगारही देता येऊ शकतो.
उद्योगांच्या आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या क्लबच्या सदस्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विभागाचे अध्यक्ष प्रतीक कळंबटे, सचिव प्रकाश भुरवणे, खजिनदार सागर वायंगणकर, कोकण विभाग प्रमुख राम कोळवणकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.