चिपळूण-शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा खरा गुरू

चिपळूण-शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा खरा गुरू

Published on

शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा खरा गुरू : संजय जाधव

चिपळूण, ता. 10 ः शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा खरा गुरू आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे येथे शिक्षण घेऊन मुले देशात-परदेशात उच्च पदावर काम करत आहेत. आमच्या काळात गुरूवर्य शिक्षकांनी आमचे कान धरून शिस्त लावली म्हणूनच आज आम्ही आमच्या उद्योग व्यवसायात यशस्वी होऊ शकलो, असे चिपळूणमधील तरुण उद्योजक पोफळी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव यांनी सांगितले.
तालुक्यातील पोफळी येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी येथे गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त माजी विद्यार्थी ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भगवान परशुराम, सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागतगीतांनी कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या वेळी 1996 बॅचमधील शाळेचे विद्यार्थी संजय जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 1996 मधील दहावीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत गुरूपौर्णिमेचा औचित्य साधून आपण गुरूपौर्णिमेची गुरूदक्षिणा म्हणून शाळेला काहीतरी देणे लागतो, या एकमेव सामाजिक दायित्व निभावण्याच्या उद्देशाने शाळेच्या मागणीनुसार उच्च दर्जाच्या नॅशनल कंपनीच्या सुमारे 60 खुर्च्या शाळेला भेट दिल्या. यासोबत विद्यार्थ्यांच्या मागणीवरून अनेक विद्यार्थ्यांना बॅडमिंटन साहित्य भेट दिली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शरद सोळुंके, शशिकांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या वेळी मुख्याध्यापक शरद सोळुंके, महेंद्र कापडी, वेदांकी कदम, गीतांजली ताम्हणकर, विजय कवडे, नीलेश काणेकर, रामलिंग चौधरी, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीपकुमार यादव यांनी केले तर महेंद्र कापडी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

................नागेश पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.