संक्षिप्त

संक्षिप्त

फोटो ओळी
-rat१०p२.jpgKOP२३M१५१५२ -रत्नागिरी ः रोटरी रत्नागिरीच्या अध्यक्षपदी निवड झालेले श्रीकांत भुर्के यांचा हरजित सिंग तलवार यांनी सत्कार केला.
----------
रोटरी रत्नागिरीच्या अध्यक्षपदी श्रीकांत भुर्के
रत्नागिरी ः रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी श्रीकांत भुर्के, सचिव प्रमोद कुलकर्णी, खजिनदार प्रकल्प आराध्ये आणि सर्व बोर्ड डायरेक्टर यांची निवड करण्यात आली असून, पदग्रहण सोहळ्यात त्यांनी पदभार स्वीकारला. ही नियुक्ती २०२३-२४ या वर्षासाठी राहणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईतून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१, २०१९-२०चे माजी गव्हर्नर हरजित सिंग तलवार हे प्रमुख अतिथी म्हणून तर असिस्टंट गव्हर्नर डॉ. केतन चौधरी उपस्थित होते. या वेळी राजेंद्र घाग, रूपेश पेडणेकर यांनी केलेल्या कामाचा आढावा मांडला. विशेष प्रोजेक्टमध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे दिल्या जाणाऱ्या एनआयसीयू या कामाचे सर्वांनी कौतुक केले. या प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत जास्तीत जास्त उभी करणाऱ्या रोटरी सदस्य नीलेश मुळे, सचिन शिंदे, नीता शिंदे, दिलीप भाटकर, दीप्ती भाटकर यांचा सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष भुर्के यांनी येणाऱ्या वर्षात आयोजित केलेल्या कामाची माहिती दिली. विशेष कामगिरी करणाऱ्या रत्नागिरीमधील व्यक्ती विशाल भावे, प्रमोद कोनकर, अक्षय फाटक आणि स्वप्नजा मोहिते यांचादेखील रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सत्कार करण्यात आला.


फोटो ओळी
Rat१०p१८.jpg ः३M१५१९४ दहागाव ः विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधताना मान्यवर.
-----------
दहागाव हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक सभा
मंडणगड ः तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक संघाची सर्वसाधारण सभा झाली. सभेला शालेय समितीचे अध्यक्ष मदन दळवी, गावचे सरपंच मंगेश दळवी, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष लोखंडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या गांधी, प्रशालेचे मुख्याध्यापक हुलगे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी केले. प्रास्ताविक प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक पी. बी. जाधव यांनी केले. दहावी परीक्षेतील तसेच स्कॉलरशिप परीक्षा, NMMS परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक हुलगे यांनी शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम, शालेय शिस्त, पालकांची जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले.

फोटो ओळी
-rat१०p१७.jpg ः KOP२३M१५१८५ राजापूर ः जि. प. शाळा शीळ नं. १ येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

शीळ शाळेत शालेय साहित्य वाटप
राजापूर ः राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाच्या वतीने शहरानजीकच्या शीळ शाळा नं. १ मध्ये गरजू, हुशार, होतकरू मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात करण्यात आले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मोंडे, सरपंच अशोक पेडणेकर, रवींद्र नागरेकर, नामदेव नागरेकर, पत्रकार राजेंद्र बाईत, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अंकिता बाईत आदी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने पहिली ते सातवीतील मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. शीळ शाळेला मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

होळी, दळे शाळेत छत्र्या वाटप
राजापूर ः मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या भानजी यांनी राजापूर तालुक्यातील होळी येथील अनिल होळकर यांच्या विनंतीवरून होळी आणि दळे प्राथमिक शाळा नं. एक या दोन प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना छत्र्या दिल्या आहेत. या वेळी पत्रकार राजन लाड, सुनील करगुटकर, होळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल होळकर, दळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्नील सोगम, कुवेशी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक अरूण सुर्वे, होळीचे मुख्याध्यापक भोंडवे सहशिक्षक कोकणे, लासे, अस्मिता गोसावी, पारकर, करगुटकर यांसह पालकवर्ग उपस्थित होते.

कालसेकर ज्युनि. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
राजापूर ः शहरातील रानतळे येथील नॅशनल इंग्लिश स्कूल अॅन्ड ए. ई. कालसेकर ज्युनि. कॉलेज, रानतळे राजापूर येथे ११ वीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संस्थेचे अध्यक्ष असिफअली चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी संस्थेचे खजिनदार शरफुद्दीन शेमना यांनी आपल्यावरील असलेल्या पुढील शिक्षणाच्या जबाबदारीचा विचार करता सकारात्मक विचार व त्याला संवादाची जोड दिल्यास पुढील शैक्षणिक उपक्रमात कसे यश संपादन करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आसिफअली चौगुले व सदस्य शमसुद्दीन काजी, कलीम चौगुले व मुख्याध्यापिका सबा दादन तसेच सहशिक्षक शिक्षिका हजर होत्या. कार्यकमाचे सुत्रसंचालन या शाळेची विद्यार्थिनी झोया कोंडकर हिने केले तर आभार मुख्याध्यापिका सबा दादन यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com