मलेरियाच्या प्रतिबंधासाठी
सावंतवाडीत फवारणी करा

मलेरियाच्या प्रतिबंधासाठी सावंतवाडीत फवारणी करा

मलेरियाच्या प्रतिबंधासाठी
सावंतवाडीत फवारणी करा

आनंद नेवगी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाल्याने मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. नेवगी यांनी निवेदनात म्हटले आहे, की ‘‘सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात डासांची समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना डासांचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडून दरवर्षी डास प्रतिबंधक फवारणी केली जाते. यावर्षीही आवश्यक मोहीम पालिकेकडून हाती घेण्यात आली आहे; मात्र, डासांची पैदास पुन्हा निर्माण झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात मलेरियासारखे रुग्णही आढळून आले आहेत तरी या संदर्भात गांभीर्याने घेत शहरात पुनश्च एकदा डास फवारणी करण्यात यावी.’’ दरम्यान, श्री. नेवगी यांच्या या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी साळुंखे यांच्याकडून तात्काळ आरोग्य विभागाला सूचित करण्यात आले. ज्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी करण्यात आलेली आहे, तेथे आणि इतरही पुन्हा डास फवारणी करा, असे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com