सागवेतील विद्युत केंद्रासाठी निधी द्या

सागवेतील विद्युत केंद्रासाठी निधी द्या

Published on

पान २ साठी


सागवेतील विद्युत केंद्रासाठी निधी द्या
विनायक कुवेस्कर ; सागवे, नाणार, कुंभवडेतील चार हजार ग्राहकांची गैरसोय
राजापूर, ता. १० ः सागवे येथे मंजूर असलेल्या विद्युत ३३/११ केव्ही केंद्राला निधी उपलब्ध करावा, सागवे परिसरातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्याचीही मागणी सागवे विभाग भाजपाच्या वतीने युवा मोर्चा उपाध्यक्ष विनायक कुवेस्कर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सागवे, नाणार, कुंभवडे या गावच्या पंचक्रोशीतील सुमारे ४ हजार विद्युत ग्राहक आहेत. या परिसरात येणारी लाईन कोंडये येथून येत असून कोंडये ते सांगवे हे ३० ते ३२ किमी अंतर आहे. ही लाईन झाडाझुडपातून आली आहे. येथील लाईनवर काम करणारे कर्मचारी अपुरी असल्याने या लाईनला देखभाल दुरुस्ती करणे मोठे जिकिरीचे आहे. त्यामुळे गेली १० वर्षे येथील ग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे गैरसोय दूर करण्यासाठी ३३/११ केव्ही केंद्र सागवे येथे मंजूर आहे. यासाठी लागणारी जमीन येथील पाच ते सहा शेतकऱ्यांनी बाजारभावाप्रमाणे देऊ केली आहे; परंतु संबंधित अधिकारी सरकारी जागा शोधत आहे. तशी सरकारी जागा येथे उपलब्ध नाही. असे असताना हे अधिकारी हा अट्टाहास धरत आहेत, याचे ग्रामस्थांना कोडे पडले आहे. दुसरीकडे निधी नसल्याने केंद्राच्या कामाला चालना देता येत नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या केंद्राच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने कुवेस्कर यांनी निवेदनामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.