अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला सहाय्य करा

अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला सहाय्य करा

15242
देवगड ः येथील आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला सहाय्य करा

‘महाविकास’ची मागणी; जामसंडे प्रकरणी आगार व्यवस्थापकांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः जामसंडे येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने येथील आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबधित एसटी चालकाविरूद्ध एसटी खात्यामार्फत कठोर कारवाई करावी. मृताच्या कुटुंबाला त्वरीत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबरोबरच जखमीच्या उपचाराचा सर्व खर्च खात्याकडून करावा, अशी मागणी करण्यात आली. आपल्या मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले.
जामसंडे येथे झालेल्या अपघातामध्ये येथील आनंदवाडीमधील दोन तरूण जखमी झाले होते. त्यातील एकाचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा तरूण उपचार घेत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक लाड यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, की ‘‘जामसंडे येथे देवगड वानिवडे बसच्या झालेल्या अपघातामध्ये देवगड आनंदवाडी येथील दोन तरुण तेजस तुषार बांदेकर, तन्मय तुषार बांदेकर हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे नेले होते. यातील तेजसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संबधित बस चालकावर एसटी विभागामार्फत कठोर कारवाई करावी. तसेच मृताच्या कुटुंबाला त्वरीत आर्थिक सहाय्य करावे. तन्मय तुषार बांदेकर याच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी खात्याकडून करावा. तसेच मृताच्या कुटुंबातील व्यक्तीला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे. या मागण्यांची त्वरीत पूर्तता न झाल्यास महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. यावेळी स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर तसेच नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, नगरसेवक तेजस मामघाडी, नगरसेवक रोहन खेडेकर, सुधीर तांबे, माजी नगरसेवक विकास कोयंडे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील तिर्लोटकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, माजी तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, तुषार भाबल, सजाऊद्दीन सोलकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संबधित चालकाला निलंबित केले आहे. जखमींच्या बाबतीत आपल्या स्तरावरील प्रशासकीय कोणतीच अडचण येऊ देणार नसल्याचे आगार व्यवस्थापकांनी शिष्टमंडळाला सांगितले.
.........
चौकट
वेगमर्यादा पाळा
एसटी आगारातील गाड्यांनी शहरातून जाताना वेगमर्यादा पाळावी. शहरातील वर्दळ लक्षात घेता याबाबतच्या काही सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात, असे यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने सुचवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com