रांबाडेवाडीसाठी नवीन बससेवा सुरू

रांबाडेवाडीसाठी नवीन बससेवा सुरू

Published on

रांबाडेवाडीसाठी नवीन बससेवा सुरू
साडवली ः वायंगणे-देवरूख बस किरडुवेमध्ये जात असल्याने नागरिकांना किरडुवे फाटा ते तुळसणीपर्यंत चालत जावे लागत होते; परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागणी केल्यानंतर आजपासून वायंगणे किरडुवे देवरूख बस प्रवाशांना तुळसणीपर्यंत सोडून नंतर किरडुवेमध्ये गेली. त्यामुळे प्रवाशांची होणारी पायपीट आज कित्येक वर्षानंतर थांबली. तसेच सायंकाळी 5.30 वा. विशेष रांबाडेवाडीदेखील आजपासून चालू करण्यात आली. दोन्ही मागण्या आगार व्यवस्थापकांनी पूर्ण केल्याबद्दल मनसेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. या मागणीचा पाठपुरावा करणारे मनसेचे वायंगणे ग्रामपंचायत सदस्य समीर रांबाडे यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपटा तिठा-मनूताईचा पार रस्ता खचला
गणपतीपुळे ः रत्नागिरी तालुक्यामधील स्वयंभू तीर्थस्थान असणाऱ्या गणपतीपुळे गावामध्ये आपटातिठा ते मनूताईचा पार या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सांडपाण्यासाठी लाईन टाकताना खोदलेला रस्ता पूर्णपणे ढासळला असून, अनेक ठिकाणी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला दिसत आहे; मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे किंवा सार्वजनिक बांधकामाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. याच रस्त्यावरून हजारो गाड्या ये-जा करत असतात; मात्र या खचलेल्या रस्त्यातूनच त्यांना मार्गक्रमण करावा लागतो. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील वाहनधारकांना पडला आहे. एकूणच संबंधित स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्र येऊन या रस्त्याबाबत रस्ते खचले असल्याचे बोर्ड लावावेत, असे मत व्यक्त केले जात आहे. हे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केले त्याला तातडीने बोलावून हा खचलेला रस्ता दाखवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गणपतीपुळे येथील ग्रामस्थांकडून सुरू आहे. तसे न झाल्यास तिथे काही दिवसांतच गणपतीपुळे येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. तरी संबंधित सार्वजनिक विभाग यांनी यामध्ये लक्ष घालून त्वरित ही साईटपट्टी वेळीच व्यवस्थित करावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.