संगमेश्वर ः 2 शिक्षकी शाळेवर 3 शिक्षकांची नेमणूक

संगमेश्वर ः 2 शिक्षकी शाळेवर 3 शिक्षकांची नेमणूक

Published on

दोन शिक्षकी शाळेवर ३ शिक्षकांची नेमणूक

संगमेश्वर शिक्षण विभाग ; कारभारात गोंधळ
संगमेश्वर, ता. १० ः संगमेश्वरजवळच्या शिवणे शाळा नं. १ शाळेवरील कामगिरीवर काढलेल्या शिक्षकाला त्या शाळेत पुन्हा रूजू करण्यात आल्याने दोन शिक्षकी शाळेमध्ये तीन शिक्षक अशी विचित्र अवस्था निर्माण झाली असून, शिक्षण विभागाचा गोधळात गोंधळ अशी अवस्था निर्माण झाली आहे; मात्र याच गावातील शाळेमध्ये चार दिवसांमध्ये चार शिक्षक बदलल्यामुळे शिक्षण विभागाचे नक्की चाललंय तरी काय, असा सवाल पालक आणि ग्रामस्थ विचारत आहेत.
संगमेश्वरजवळ शिवने शाळा नं. १ ही पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून, या शाळेमध्ये १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये पूर्वी दोन शिक्षक कार्यरत होते; मात्र एका शिक्षकाची जिल्हाबदली झाल्याने एक शिक्षक कार्यरत होता; मात्र या शाळेवर एक शिक्षक कामगिरीवर नेमण्यात आल्याने दोन शिक्षकांची नेमणूक झाली; एका शिक्षकाला पुन्हा कामगिरीवर काढण्यात आल्याने एक शिक्षकी असणाऱ्या शाळेवर शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शिक्षकभरती करण्यात आली. एका शिक्षकाला भरती करण्यात आले. त्यामुळे पुन्हा ही द्वीशिक्षकी शाळा झाली; मात्र चार दिवसांपूर्वी या शाळेवर कामगिरीवर काढण्यात आलेल्या शिक्षिकेला पुन्हा रूजू करण्यात आले आहे. त्यामुळे द्विशिक्षकी शाळेमध्ये तीन शिक्षक अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाच्या या गोंधळामुळे पालकही संभ्रमात पडले आहेत. याच गावातील शाळेमध्ये गेले चार दिवस वेगवेगळे शिक्षक येऊन शिकवत असल्याने नक्की आपल्याला कायमस्वरूपी शिक्षक कोण? अशा संभ्रमात विद्यार्थी आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुका शिक्षण विभागाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.