मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील 
खड्डे बुजविण्याची मागणी

मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

Published on

15263
सावंतवाडी ः अधिकाऱ्यांना निवेदन देताना गुळदुवे ग्रामस्थ.

मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील
खड्डे बुजविण्याची मागणी
बांदा ः मळेवाड-आरोंदा रस्त्यावर खरी येथे उतारावर जलवाहिनीसाठी रस्ता खोदला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने या खोदलेल्या रस्त्यावर काँक्रिट घालून रस्ता सुरळीत केला; मात्र यावर घातलेले काँक्रिट आता उखडले असून त्या ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले आहेत. हे खड्डे उतारावर असल्याने तसेच पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचत असल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, असे निवेदन गुळदुवे येथील ग्रामस्थ व वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिले. यावेळी अधिकारी लोहार यांनी लवकरात लवकर काम करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी गोविंद आळवे, गुळदुवेचे माजी सरपंच प्रवीण जोशी, मदन मुरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत आदी उपस्थित होते.
...............
15264
बांदा ः निमजगा शाळेस देणगी सुपूर्द करताना मिलिंद नाईक व इतर.

नाईक कुटुंबाकडून निमजगा शाळेस देणगी
बांदा ः नारायण परशुराम नाईक यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त उद्योजक मिलिंद नाईक व कुटुंबीयांनी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निमजगा प्रशालेस रोख पाच हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीबाबत नाईक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर व पालकांनी आभार व्यक्त केले. यावेळी साईशा नाईक, मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ, शिक्षक लुईजा गोन्सालवीस, सुपर्णा भाईप, सुरेखा गावडे, मालू लांबर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.