भांडणे, वादविवादामुळेच विवाहिता घरातून बाहेर

भांडणे, वादविवादामुळेच विवाहिता घरातून बाहेर

Published on

पान १ साठी)


भांडणे, वादावादीमुळेच
विवाहिता घरातून बाहेर
तिघांना शोधण्यात यश; पती अद्यापही बेपत्ता
दाभोळ, ता. १० ः दापोली तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील बेपत्ता झालेल्या चौघांपैकी तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. सुगंधा भेलेकर हिने घरात होणारी भांडणे व वादविवाद यामुळेच मुलांना घेऊन घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा जबाब घेऊन सुगंधा व तिच्या दोन्ही मुलांना पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे. सुगंधाचा पती अद्याप बेपत्ता आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलैला विसापूर येथून भरत भेलेकर (वय ३४) हा दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा चुलत भाऊ सहदेव भेलेकर यांच्याबरोबर दुकानात जातो, असे सांगून गेला होता. तो घरी परतला नाही. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पांडुरंग भेलेकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली होती. ३ जुलैला भरत याची पत्नी सुगंधा व तिच्यासोबत ७ वर्षाचा आराध्य व ४ वर्षाचा श्री अशा दोन मुलांना घेऊन त्यांना शाळेत सोडण्याकरिता घराबाहेर पडली ती परतली नव्हती. म्हणून मुलांच्या अपहरणाचा तर सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. एकाच कुटुंबातून चौघेजण बेपत्ता झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली होती. दापोली पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात याची माहिती दिली होती. त्यानुसार सुगंधा भेलेकर ही ठाणे परिसरात दोन मुलांसमवेत असल्याची माहिती मिळाल्यावर कॉन्स्टेबल विकास पवार यांना हे तिघे ठाणे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर सुगंधाशी संपर्क साधण्यात त्यांना यश आले व तिने आपण दोन मुलांसह दापोली येथे बसने येत असल्याची माहिती दापोली पोलिसांना दिली. काल (ता. ९) ते सुगंधा व दोन मुलांसह दापोलीला येण्यासाठी ठाणे येथून निघाले. पालगड येथे ती मुलांसह उतरल्यावर विकास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिघांना दापोली पोलिस ठाण्यात आणले. या वेळी सुगंधा भेलेकर हिने घरात होणारी भांडणे व वादविवाद यामुळेच मुलांना घेऊन घरातून बाहेर पडल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा जबाब घेऊन सुगंधा व तिच्या दोन्ही मुलांना पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, भरत भालेकर हा अजूनही बेपत्ता असून त्याचा तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.