24 तासानंतर दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती

24 तासानंतर दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती

Published on

पान १ साठी

१५२९९

तब्बल २४ तासांनी
दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती
भोवऱ्यात सापडले; कोस्टलच्या पाणबुडीमुळे शोध
चिपळूण, ता. १० ः पावसाळी फिरण्याचा, पोहण्याचा आनंद घेण्यासाठी कुंभार्ली गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनाऱ्यावर आठ जण गेले होते. त्यातील सहा जण नदीपात्राबाहेर उभे होते, मात्र दोघेजण वाशिष्ठी नदीत अंघोळीसाठी पाण्यात उतरले आणि डोहाच्या प्रवाहात अडकून पडले. त्यानंतर ते गायबच झाले. तब्बल २४ तास शोधमोहीम सुरू होती. त्यासाठी कोस्टल गार्डची पाणबुडी मागविण्यात आली. डोहापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदीपत्रात अब्दुल कादीर नोशाद लासने (जिव्हाळा सुपर बाझार शेजारी) याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर काही वेळाने आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला) याचाही मृतदेह डोहात सापडला.
शहरालगतच्या मिरजोळीलगतच्या एका हायस्कूलमधील दहावीच्या वर्गात शिकणारे हे आठ विद्यार्थी एकत्रीतपणे पावसाळी आनंद घेण्याच्या उद्देशाने रविवारी दुपारी चार वाजता निघून गेले. कुंभार्ली गणेशवाडी येथील वजहर या ठिकाणी वाशिष्ठी नदीपात्रातच मोठा डोह असून, तेथील धबधबा व पाणी पाहून ते आकर्षित झाले आणि तेथे पोहायला गेले. काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सहा जण तातडीने पात्राबाहेर येऊन कातळावर उभे राहिले; मात्र दोघेजण डोहातच अंघोळ करीत होते. जोरदार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणखी वाढला. त्यामुळे अचानक डोहातील पाण्याची पातळी व तेथील भोवऱ्यात आतीक इरफान बेबल (बेबल मोहल्ला), अब्दुल कादीर नोशाद लासने (जिव्हाळा सुपर बाझारशेजारी, चिपळूण) हे दोघेही सापडले. काही क्षणात ते दोघेही गायब झाले. त्यानंतर रविवारपासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत शोधमोहीम सुरू होती. काही जाणकारांच्या मदतीने हुक टाकून व त्यानंतर बांबूच्या साहाय्याने शोध घेतला. याशिवाय एक-दोन धाडसी तरुणांनी डोहात उतरून त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही काहीच हाती लागले नाही.
या शोधमोहिमेसाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे व पोलिस कर्मचारी तळ ठोकून आहेत. सोमवारी दुपारी आमदार भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, सामाजिक कार्यकर्ते नाजिम अफवारे यांच्यासह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.

चौकट
वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह
महाड येथील एसआरटीच्या पथकाने त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तोही असफल ठरला. अखेर कोस्टल गार्डचे पथक मागवून दोन पाणबुड्या डोहात सोडल्या; परंतु त्यांनाही डोहात चार तास शोधमोहीम राबविल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला. त्याआधी घटनास्थळापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदी पात्रात अब्दुल कादीर नोशाद लासने याचा मृतदेह सापडला. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.


दृष्टिक्षेपात
वाशिष्ठी पात्रातील मोठ्या डोहाचे आकर्षण
८ पैकी ६ बाहेर, दोघे पोहोण्यासाठी उतरले
धाडशी तरुणांकडून डोहात उतरून शोध
महाड येथील एसआरटी पथक अपयशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.