चौकेतील एकावर 
धमकीप्रकरणी गुन्हा

चौकेतील एकावर धमकीप्रकरणी गुन्हा

Published on

चौकेतील एकावर
धमकीप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : एका खासगी कंपनीकडून आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकारातून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला. त्यात गुंतविण्यात आलेले पैसे तातडीने द्या, असे सांगत आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दादू महादेव चौकेकर (रा. चौके-मालवण) यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार उमेश वाडकर याच्यावर अदलखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार व विरोधक हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीतून तक्रारदाराच्या मुलाने संबंधित कंपनीत पैसे गुंतविले होते; मात्र त्यानंतर कंपनीकडून पैसे वेळेत परत केले नसल्याने दोघांत वाद झाला. यातून आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चौकेकर यांनी दिली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणे अंमलदार सतीश देसाई यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.