अधिक श्रावण कीर्तन सप्ताह

अधिक श्रावण कीर्तन सप्ताह

१३ (टुडे पान ३ साठी, अँकर)

- rat११p१.jpg-
२३M१५३६८
तेजस्विनी कुलकर्णी, विजय मांदुस्कर, मृणाल गावकर, मोहक रायकर, श्रीकांत बापट, ज्योत्स्ना गाडगीळ, तेजस्विनी जोशी.
-----------

रत्नागिरीत अधिक श्रावण कीर्तन महोत्सव

चित्पावन ब्राह्मण; बारावे वर्ष, युवा, ज्येष्ठांची कीर्तने

रत्नागिरी, ता. ११ ः अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे यंदाचे हे तपपूर्ती वर्ष आहे. १८ ते २४ जुलैपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मंडळाच्या जोशी पाळंद येथील श्री भगवान परशुराम सभागृहात हा सप्ताह युवा व ज्येष्ठ कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेने रंगणार आहे.
येत्या १८ जुलैला हभप तेजस्विनी कुलकर्णी (पुणे) या नरव्याघ्र तानाजी मालुसरे यावर कीर्तन करणार आहेत. त्या सात वर्षे कीर्तने करत असून, कीर्तन चंद्रिका (मुख्य) ही पदवीप्राप्त आहे. महाराष्ट्र व राज्याबाहेर कीर्तनसेवा, श्रीरामकथा, प्रवचन सेवा सादर केल्या आहेत. १९ जुलैला हभप विजय मांदुस्कर (रानपाट, लाजूळ) हे दुर्वास ऋषींचे आमरस भोजन यावर कीर्तन करतील. १९७८पासून ते कीर्तने करत असून, आतापर्यंत सुमारे दीड हजार कीर्तने बुवांनी केली आहेत. २० जुलैला हभप मृणाल गांवकर (मालवण) संत जनाबाई आख्यान विषयावर कीर्तन करणार आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची शास्त्रीय गायनाची मध्यमा प्रथम परीक्षा दिली आहे.
२१ जुलैला युवा कीर्तनकार हभप मोहक रायकर (डोंबिवली) हे एकनाथ शिष्य-गावबा चरित्रावर कीर्तन करतील. ते कीर्तन विशारद असून, १० वर्षे नारदीय कीर्तनकार म्हणून कार्यरत आहेत. कीर्तन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. २२ जुलैला हभप श्रीकांत बापट (मुर्डी, आंजर्ले, ता. दापोली) हे मिनलदेवी कथा आख्यानावर कीर्तन करतील. हभप महेशबुवा काणे यांच्याकडे त्यांचे कीर्तन अलंकारपर्यंतचे शिक्षण झाले आहे. २३ जुलैला हभप ज्योत्स्ना गाडगीळ (अंबरनाथ-मुंबई) या रोहिडेश्वराची शपथ यावर कीर्तन करतील. त्या संगीत विशारद, गांधर्व विद्यालय नाट्यसंगीत पदविका प्राप्त आहेत. वयाच्या दहाव्या वर्षांपासून कीर्तनाला सुरवात केली. आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ५००हून अधिक कीर्तन प्रयोग सादर केले आहेत. २४ जुलैला युवती कीर्तनकार हभप तेजस्विनी जोशी (रत्नागिरी) सुभद्रा आभास यावर कीर्तन करतील. ती एफवायबीए वर्गात शिक्षण आहे. तिच्या घराण्यात कीर्तन परंपरा आहे. आजवर तिने १०० कीर्तने केली आहेत.

चौकट १

हे कलाकार करणार साथसंगत

कीर्तन सप्ताहात ऑर्गनची साथसंगत निरंजन गोडबोले, आनंद पाटणकर, श्रीरंग जोगळेकर, श्रीधर पाटणकर, मंगेश मोरे, चैतन्य पटवर्धन व विजय रानडे करणार आहेत. तबला साथसंगत पुष्कर सरपोतदार, प्रथमेश शहाणे, देवाशीष बापट, निखिल रानडे, प्रथमेश फाटक, सुयश जोशी व स्वरूप नेने करणार आहेत. कीर्तन सप्ताहाचा आस्वाद सर्व कीर्तनप्रेमी श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन चित्पावन मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com