पर्यटन

पर्यटन

-rat१०p२४.jpg ः
23M15408
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पर्यटनक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेले आणि निरूळ गावातील सांबमंदिर.
-rat१०p३०.jpg-
23M15409
निरुळ येथील सांब मंदिराजवळून वाहणारी नदीमुळे येथील परिसर अधिक रमणीय भासतो.
-------

निरुळमधील सांब मंदिराकडे पर्यटकांची पावले

पावस, ता. ११ः रत्नागिरी तालुक्यातील निरुळला पर्यटनक्षेत्राचा क दर्जा मिळाला असून पावसाळी पर्यटनासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. येथील सांब मंदिर नदीकिनारी असल्याने पावसाळ्यावेळी दिसणारे दृश्य अवर्णनीय आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर अनेक कुटुंबे वर्षा सहलीकडे कल असतो. रत्नागिरी तालुक्यातील निरूळ येथील सांब (शिव) मंदिरात दर्शनाला जाऊन मंदिराशेजारून वाहणाऱ्या नदीचा परिसर पाहून पर्यटक खूष होतात. नदीमध्ये असणारे मोठ-मोठ्या कातळामुळे त्यावरून जाणाऱ्या पाण्यामुळे धबधब्याचा भास होतो. या गावाला पर्यटनक्षेत्राचा क दर्जा मिळाल्यामुळे अनेकजण या परिसराला आवर्जून भेट देत आहेत. प्रामुख्याने श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. निरूळ हे गाव पावसपासून अवघ्या ७ किमी अंतरावर आहे. नदीवर जवळजवळ शंभर फूट लांबीचा लोखंडी साकव आहे. त्यावरून चालत जाऊन मंदिरात जाता येते. नदीचे पाणी, दुधासारखे शुभ्र फेसाळलेले पाणी यामुळे येथे पर्यटक आकर्षित होत आहेत. पूल संपला की लगेचच शांत, प्रसन्न प्रशस्त शिवमंदिर आहे.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com