माऊली संगीत विद्यालयातर्फे तळवणेत ‘गुरुवंदना’

माऊली संगीत विद्यालयातर्फे तळवणेत ‘गुरुवंदना’

Published on

15415
तळवणे ः येथे गुरुवंदना कार्यक्रमासाठी उपस्थित भाविक.

माऊली विद्यालयातर्फे तळवणेत ‘गुरुवंदना’

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः माऊली संगीत विद्यालय व गुरुकृपा विद्यालय, तळवणे यांच्यावतीने गुरू-शिष्याचे अतूट नाते जपणारा गुरुपौर्णिमा उत्सव परशुराम भारती महाराज मठात स्वामी राजेंद्र भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. ९) साजरा झाला.
तळवणे येथील माऊली संगीत विद्यालय व गुरुकृपा संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक भावेश राणे, संतोष (बाबू) गोडकर यांच्या वतीने तसेच अजित पोळजी, तळवणे ग्रामस्थ व संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री. राजेंद्र भारती महाराज यांच्या हस्ते गणेश पूजन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘नमस्कार माझा ज्ञान मंदिरा’, हे स्वागत गीत सादर केले. उपस्थित गुरुवर्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गायन, वादन, पखवाज, तबला सोलो आदी कला सादर करून गुरुंना वंदन केले. मान्यवरांनी संगीत अलंकार दीप्तेश मेस्त्री यांचे कौतुक केले. सरपंच समीर केरकर, उपसरपंच रामचंद्र गावडे, संदीप नेमळेकर, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, पखवाज-तबला वादक प्रदीप वाळके, सीमा गिरी, मदन मुरकर, गजानन मेस्त्री, पखवाज अलंकार मनीष तांबोस्कर, पखवाज विशारद सचिन पांगम, शैलेश मेस्त्री, सागर सावळ, शिवाजी कवडे उपस्थित होते. पंकज तळवणेकर यांनी सूत्रसंचालन केले. अजित पोळजी यांनी आभार मानले. अजित तळवणेकर, महेश तळवणेकर यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.