‘राष्ट्रवादी’तून गेलेल्यांनी
भाजपची खेळी ओळखावी

‘राष्ट्रवादी’तून गेलेल्यांनी भाजपची खेळी ओळखावी

15394
सावंतवाडी ः जितेंद्र आव्हाड यांचे स्वागत करताना अर्चना घारे-परब व पदाधिकारी.

‘राष्ट्रवादी’तून गेलेल्यांनी
भाजपची खेळी ओळखावी

जितेंद्र आव्हाड; सावंतवाडीत स्वागत

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः मंत्रिमंडळ विस्तार होऊन आठवडा उलटला तरी मंत्रिपदे दिली जात नाहीत. यावरूनच राष्ट्रवादीतून गेलेल्यांनी भाजपची खेळी ओळखावी, असा सल्ला राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आव्हाड यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या जुन्या टिकेचा संदर्भ घेत पवारांना कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे फू फू करणे नव्हे, असा टोला हाणला.
मंत्री आव्हाड हे आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले असता सावंतवाडीतील जयप्रकाश चौकात त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले, महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अफरोज राजगुरू, जावेद शेख, काशीनाथ दुभाषी, सायली दुभाषी, राकेश नेवगी, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते. यावेळी श्री. आव्हाड म्हणाले, ‘‘सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टिकेवरून भाजपनेच शरद पवार यांचे घर फोडले हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोण सांगत असेल की आपण त्यातले नाही, त्याचा खरा चेहरा खोत यांनीच उघड केला आहे. जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेत त्यांना अद्याप मंत्रीपदे देण्यात आली नाहीत. विस्तार होऊन आठवडा उलटून गेला आहे. त्यामुळे गेलेल्यांनी आतातरी भाजपचा डाव ओळखावा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com