रत्नागिरी ः सानेगुरूजींची पालगड, कर्वेची मुरूड शाळेचा विकास

रत्नागिरी ः सानेगुरूजींची पालगड, कर्वेची मुरूड शाळेचा विकास

फोटो ओळी
- rat११p३१.jpg- २३M१५४३३ दापोली ः पालगड येथील सानेगुरुजींच्या गावातील शाळा.
- rat११p३३.jpg-P२३M१५४३५ दापोली ः मुरूड गावातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळा.


पालगड, मुरूड मराठी शाळेचा होणार कायापालट

महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळा ; १३ शाळांसाठी १४ कोटी ३० लाख

हर्णै, ता. ११ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केली होती. राज्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये दापोली तालुक्यातील सानेगुरूजींच्या पालगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मुरूड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला निधी मंजूर झाला आहे. येथील शाळा प्रशस्त व सुसज्ज बांधण्यासाठी पावणेचार कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
देश उभारणीत ज्या-ज्या महापुरुषांनी बहुमोल योगदान दिले आहे, त्यांच्या जन्मगावातील शाळांचा विकास करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. पहिल्या टप्प्यात दहा महापुरुषांच्या जन्मगावांचा प्रस्ताव तयार केला होता. अर्थसंकल्पीय भाषणात वित्त मंत्रालयाकडून महापुरुषांशी संबंधित ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला निधी मंजूर झाला आहे. तसा शासन निर्णय ७ जुलै २०२३ ला काढण्यात आला आहे. राज्यातील १३ शाळांसाठी १४ कोटी ३० लाख २० हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील यामध्ये दापोली तालुक्यातील सानेगुरूजींच्या पालगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मुरूड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे. मुरुड शाळेसाठी ३७ लाख ३५ हजार ११५ रुपये तर सानेगुरुजींच्या पालगड येथील शाळेसाठी ३ कोटी ३८ लाख ३२ हजार २७६ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळा आधुनिक केल्या जाणार आहेत. तेथे सुसज्ज इमारती बांधल्या जाणार आहेत. या महापुरुषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या सर्व शाळा ऐतिहासिक असल्याने नव्या पिढीसमोर आपापल्या गावातील महापुरुषांचा आदर्श उभा राहून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारे प्रोत्साहन मिळावे असा या उपक्रमाचा उद्देश ठेवण्यात आला आहे.


चौकट
जिल्ह्यातील दहा शाळांचे प्रस्ताव
ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सहा तालुक्यातील दहा शाळांची यादी शासनाला सादर करण्यात आली होती. त्यात आंबवडे शाळा (मंडणगड), मुरुड, पालगड (दापोली), मालण नं १, आवरे, असोरे (गुहागर), कवी केशवसुत प्राथमिक शाळा (रत्नागिरी), कोट नं. १, कोलधे नं. १ (लांजा), आदर्श शाळा पिरंदवणे नं. १ (राजापूर) या शाळांचा समावेश आहे. इमारत दुरुस्तीसह नविन बांधकामासाठी मिळून पावणे कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com