Local Body Elections chiplun
Local Body Elections chiplun esakal

Local Body Elections : राष्ट्रवादीतील फुटीने दोन गट ; उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; दोन गट निर्माण झाले असले तरी कार्यकर्त्यांचा ओढा दोन्ही पवारांच्या बाजूने

चिपळूण : राष्ट्रवादी फुटल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येही दोन गट तयार झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर भिडण्याची शक्यता आहे. उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण होणार असून अनेकजण आतापासूनच तयारीला लागले आहेत.

राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर चिपळूणमधील वातावरण ढवळून निघाले आहे. अजित पवारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. असे असले तरी चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार गटात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यामध्ये केवळ चिपळूणमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.

Local Body Elections chiplun
Chiplun Politics : कोकणातला बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार? कदम-सामंत भेटीने चर्चेला उधाण

जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे सदस्य होते. चिपळूणचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले.

दोन गट निर्माण झाले असले तरी कार्यकर्त्यांचा ओढा दोन्ही पवारांच्या बाजूने असल्याचे दिसून येते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आमदार शेखर निकम यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Local Body Elections chiplun
Chiplun News : दौरा मुख्यमंत्र्यांचा, मात्र त्रास सामान्यांना; एसटीच्या शंभर फेऱ्या केल्या रद्द

दुसरीकडे माजी आमदार रमेश कदम समर्थकांची ही बैठक झाली. त्यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला; मात्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत. आमदार शेखर निकम हे कार्यकर्त्यांना विकासाचे स्वप्न दाखवत आहेत तर रमेश कदमांकडे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि पक्षाची विचारधारा याचेच भांडवल आहे.

शहरामध्ये काहींना नगराध्यक्ष व्हायचे आहे त्यासाठी नेतृत्वाचा पाठिंबा गरजेचा असल्यामुळे ते दोन्ही गटाच्या नेत्यांना संभाळून आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य होण्यासाठी एका गटांनी उमेदवारी नाकारली तर दुसऱ्या गटातून उमेदवारी घ्यायची आपल्याला नाही भेटली तर किमान पत्नीला किंवा नातेवाईकांना मिळवून द्यायची अशा पद्धतीने प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे आगामी काळात उमेदवारीवरून राष्ट्रवादीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections chiplun
Chiplun : निवडणूक प्रमुख हेच भाजपचे भविष्यातील उमेदवार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मोठी घोषणा

पवार कुटुंबामध्ये निर्माण झालेला वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्यापूर्वी संपावा, अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो. जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद आणि मतभेद निर्माण होणार नाहीत. पक्ष एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाईल.
- जयंत शिंदे, कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com