तन्वी बांदेकरचा बांद्यात सत्कार

तन्वी बांदेकरचा बांद्यात सत्कार

Published on

15477
बांदा ः येथे तन्वी बांदेकर हिचा सत्कार करताना मान्यवर.

तन्वी बांदेकरचा बांद्यात सत्कार
बांदा ः भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेत तन्वी बांदेकर हिने यश मिळविल्याबद्दल येथील गोगटे-वाळके महाविद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, सहसचिव डी. एस. पणशीकर, खजिनदार टी. एन. शेटकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तन्वीने या परीक्षेत सिंधुदुर्गात प्रथम, तर संपूर्ण भारतात १७७३ वी रँक प्राप्त केली. प्रास्ताविकात अनिल शिर्के यांनी जेईई परीक्षेचे महत्त्व विशद केले. प्राचार्य काजरेकर यांनी, यश सातत्यपूर्णतेने टिकवणे आवश्यक आहे, असे सांगितले. तन्वीने घेतलेल्या ज्ञानाचा वापर सामाजिक उन्नतीसाठी करावा, असे आवाहन वारंग यांनी केले. प्रा. वेल्हाळ यांनी शुभेच्छा दिल्या. एन. डी. कार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उमेश परब यांनी आभार मानले.
...............
15478
आचरा ः पिरावाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

पिरावाडी हायस्कूलला शैक्षणिक साहित्य
आचरा : श्री रामेश्वर विद्यामंदिर आचरा-पिरावाडी या प्रशालेच्या (कै.) वि. स. कुबल सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री तरुण संघ, दक्षिणवाडा संघाचे अध्यक्ष दीनानाथ धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मुरलीधर कोळंबकर, प्रमुख पाहुणे जयप्रकाश परुळेकर, मुजफ्फर मुजावर, शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, नारायण कुबल, मनोज वाडेकर, पांडुरंग वायंगणकर, मुख्याध्यापक रणजित बुगडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दहावीमधील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जयप्रकाश परुळेकर यांच्याकडून आठवी, नववी, दहावीच्या मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. सुविधा एज्युकेशन ट्रस्ट मुंबईतर्फे वसंत मेस्त्री यांच्या स्मरणार्थ प्रकाश मेस्त्री यांच्याकडून छत्र्या वाटप करण्यात आले. मुजावर यांनी शैक्षणिक साहित्यासाठी रोख दहा हजार रुपये मदत दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.