इवल्या इवल्या हातांनी बहारदार संवादिनीवादन

इवल्या इवल्या हातांनी बहारदार संवादिनीवादन

३६ (पान २ साठी, अॅंकर)

- rat११p३०.jpg -
२३M१५४२३
खल्वायनच्या मासिक संगीत सभेत संवादिनीवादन करताना ''चैतन्यस्वर''चे बालकलाकार.
----------
इवल्या इवल्या हातांनी बहारदार संवादिनीवादन

''चैतन्यस्वर''चे बालकलाकार ; खल्वायनच्या मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः इवल्या इवल्या हातांनी सादर केलेली रागमाला, एकेक रागांची सुंदर पखरण, आलापी-तानांनी तालबद्ध शास्त्रीय रचना तसेच सुगम संगीतातील सादर केलेली गाणी ऐकून रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध केले. येथील ''खल्वायन''च्या मैफलीत ''चैतन्यस्वर''च्या बालकलाकारांच्या संवादिनी वादनाचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले आणि प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध संवादिनीवादक चैतन्य पटवर्धन यांच्या शिष्यवर्गाने हा कार्यक्रम सादर केला.
खल्वायनची ही २९१वी मासिक संगीतमैफल बालकलाकारांनी गाजवली. चैतन्य पटवर्धन यांच्या संगीतसंयोजनाखाली त्याच्या शिष्यवर्गाने प्रथमच रंगमंचीय सादरीकरण केले आणि बाजी जिंकली. ज्येष्ठ संवादिनी वादक पं. विश्वनाथ कान्हेरे आणि मुंबईतील ज्येष्ठ गायिका हार्मनी म्युझिक फाउंडेशनच्या सुमनताई दिवाकर यांची उपस्थिती हे या बालकलाकारांसाठी आशीर्वाद होते. ऊर्जा आपटे, ओजस करकरे, गायत्री जोशी, राधा खानोलकर, मैत्रेयी देसाई, स्वराली राणे आणि प्रथमेश गद्रे यांनी नांदी आणि यमनमधल्या शास्त्रीय रचनेने मैफलीला सुरवात केली. त्यानंतर राग देस सादर झाला. पं. जितेंद्र अभिषेकी यांची सुप्रसिद्ध रागमाला कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. रागमालेतील आलापी आणि तानांचे सादरीकरण वाखाणण्याजोगे होते. अभंगांच्या मेलडीने वातावरण भक्तिमय झाले.
मैफलीच्या उत्तरार्धात काही सुगम गीते सादर झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समुद्रातील जगप्रसिद्ध उडीच्या दिवसाचे औचित्य साधून जयोस्तुते गीत अतिशय सुंदररित्या सादर करून मैफलीची सांगता झाली. या मुलांना बालकलाकार सारंग जोशी आणि स्मित केळकर यांनी उत्तम आणि तयारीने तबलासाथ केली तर अद्वैत मोरे, आदित्य फल्ले आणि राघव पटवर्धन यांनी तितकीच समर्पक अशी तालवाद्याची साथ केली. निवेदक निबंध कानिटकर यांनी संवादिनी वादनासंदर्भात, संगीत कलेविषयी काही किस्से सांगत साजेसे सूत्रसंचालन केले. खल्वायनचे प्रदीप तेंडुलकर आणि श्रीनिवास जोशी यांनी उत्तम संयोजन केले होते.
-------------
चौकट
... आणि मोबाईलच्या उजेडात मैफल रंगली
कार्यक्रम ऐन रंगात असताना महावितरणने आपली अनुपस्थिती दाखवून बेरंग केला; मात्र रसिकांचा उत्साह आणि गर्दी अजिबात कमी झाली नाही. सर्व रसिकांनी मोबाईल टॉर्च सुरू करून कार्यक्रम पुढे सुरू करायला सहकार्य केले. त्यामुळे या मैफलीला अजून वेगळीच रंगत आली.
---------
कोट
संगीत कला प्रचंड मेहनतीने साध्य होते. इवल्या इवल्या हातांनी हार्मोनियमवर वाजवलेल्या एकेक रचना पाहता अभिजात संगीताला उज्ज्वल भविष्य आहे. मुलांचे संवादिनीवर लिलया फिरणारे हात पाहून कौतुक वाटते. पालकांनीही या मुलांच्या कलेकडे फक्त ग्रेस मार्क मिळवण्याचा एक मार्ग म्हणून पाहता त्यांची कला जोपासण्याचा दृष्टिकोन बाळगावा.
- सुमनताई दिवाकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com